Maruti SkyDrive Saam Tv
बिझनेस

Maruti SkyDrive : भारतात लवकरच हवेत उडणार कार; मारुती सुझुकी इलेक्ट्रिक 'एअरकॉप्टर' बाजारात आणण्याच्या तयारीत

Shraddha Thik

Maruti Suzuki Flying Car :

देशातील आघाडीवर असलेली मोठी कार निर्मिता ही कंपनी आता आकाशातही झेप घेण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार पेट्रोल आणि सीएनजी वाहनांनंतर आता मारुती (Maruti) सुझुकी एअर कॉप्टर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

या एअर कॉप्टरची निर्मिती मारुती तिच्या जपानी मूळ कंपनी सुझुकी कॉर्पोरेशनसोबत उडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाचे म्हणजेच एअर कॉप्टर याचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. सुरुवातीला कंपनी या एअर कॉप्टरला जपान आणि अमेरिका सारख्या बाजारात लॉन्च (Launch) करेल, नंतर ते भारतीय बाजारात देखील सादर केले जाऊ शकते.

लवकरच तुम्हाला या गाड्या आकाशात उडताना दिसतील. एअर कॉप्टरची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे वजन खूप हलके असेल, ज्यामुळे ते छतावरही उतरवता येईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुतीचे एअर कॉप्टर आकाराने ड्रोनपेक्षा मोठे असेल, परंतु हेलिकॉप्टरपेक्षा लहान असेल. यात तीन लोकांसह उड्डाण करण्याची क्षमता असेल. उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी कंपनी भारतात त्याचे उत्पादन सुरू करू शकते.

सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक कॅटो ओगुरा म्हणाले की, ही प्लानिंग प्रत्यक्षात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामक (DGCA) सोबत चर्चा सुरू आहे. SkyDrive नावाचे इलेक्ट्रिक एअर कॉप्टर जपानमधील 2025 ओसाका एक्स्पोमध्ये लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे.

एअर कॉप्टर छतावरून उड्डाण करण्यास सक्षम असेल. अहवालात दावा करण्यात आला आहे की हे एअर कॉप्टर 1.4 टन वजनाच्या टेक-ऑफसह प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यास सक्षम असेल. एअर कॉप्टरचे वजन पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा निम्मे असेल. कमी वजनामुळे, ते टेकऑफ आणि लँडिंगसाठी इमारतीच्या छताचा वापर करू शकते. याव्यतिरिक्त, विद्युतीकरणामुळे, विमानाच्या भागांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परिणामी उत्पादन आणि देखभाल खर्च कमी झाला आहे, असे अहवालात पुढे म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT