भारतात मारुती सुझुकीच्या कंपनीने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कार खरेदीसाठी लाँच केल्या आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या सीएनजी एसयूव्हीची कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. या कंपनीने ग्राहकांसाठी नवीन लाँच केलेली कार म्हणजे मारुती सुझूकी ब्रेजा सीएनजी कारला ग्राहकांनी खूप पंसत केलंय. मारुती सुझूकी ब्रेजा कारची किंमत ९.२० लाख होती. ब्रेजा कारचा लूक उत्तम आहे आणि कार २५.५१ किमी पर्यंत मायलेज देते.
या कारला भारतातल्या टाटा मोटर्स,महिंद्रा यांसारख्या गाड्यांच्या मारुती सुझूकीच्या वाहनांशी स्पर्धा करावी लागत आहे. मारुती सुझूकी कंपनीने भारतात आपल्या सर्वाधिक गाड्या ग्राहकांच्या खरेदीसाठी लाँच केल्या आहेत. मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांसाठी मारुती सीएनजी ब्रेजाचे चार नवीन मॅाडेल आणले आहेत. कारर्सचे हे मॅाडेल खूप स्वत असल्याने ग्राहक सणासुदीच्या सीझनमध्ये मारुती सुझुकीच्या कारर्स खरेदी करू शकता.
मारुती सुझुकीच्या मॅाडेलमध्ये ब्रेझा सीएनजीच्या कारमध्ये एलएक्सआई,वीएक्सआई, जेडएक्सआई आणि जेडएक्सआई डीटी यांसारख्या कारर्सची माहिती ग्राहकाना मिळणार आहे. ज्या ग्राहकाना सणासुदीच्या सीझनमध्ये मारुती सुझुकीच्या कार्स खरेदी करण्याचा विचार असेल. ते लोक ही कार खरेदी करू शकतात.
मारुती सुझुकी ब्रेजाच्या पहिल्या एलएक्सआय मॅाडेलची एक्स शोरुम किंमत ९.२९ लाख रुपये आहे. तर ऑन-रोड एलएक्ल कारची किंमत १०.३७ लाख रुपये आहे. जर ग्राहकांना मारुती सुझुकी एलएक्स सीएनजी कार खरेदी करायची असेल तर, ग्राहक २ लाख रुपयांचा डाउन पेमेंट भरुन या कारवर ८.३७ लाखांचं कर्ज मिळवू शकता. ग्राहकांच्या एलएक्सआई कारचा कर्जाचा कालावधी पाच वर्षाचा असेल तर, त्यांना या कारवर ९ टक्के व्याज लागणार आहे.
पाच वर्षासाठी ग्राहकांना ९ टक्के व्याजदरावर दरमहा १७,३७५ रुपये EMI भरावा लागेल. मारुती सुझुकीच्या एलएक्सआई साएनजी कारवर ग्राहकांना २.०५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज भरावा लागणार आहे.
मारुती सुझुकीच्या दुसऱ्या वीएक्सआई मॅाडेलची एक्स शोरुम किमंत १०.६४ लाख रुपये आहे. वीएक्सआई कारची ऑन किंमत १२.२७ लाख रुपये आहे. वीएक्स कार खरेदी करताना विक्रेते जर, २ लाख रुपयांच्या डाउन पेमेंट भरणार असतील, तर विक्रेत्यांना १०.२७ लाख रुपयांचे कर्ज भरावे लागणार आहे.
या १२.२७ रुपयांवर ग्राहकांना पाच वर्षासाठी ९ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. ग्राहकांना ९टक्के व्याजासाठी पुढे पाच वर्षासाठी २०,९०४ रुपयांचा EMI भरावा लागेल. वीएक्सआईच्या कारसाठी ग्राहकांना खरेदीसाठी २.४७ व्याज लागणार आहे.
मारुती सुझुकीच्या जेडीएक्सआय कार मॅाडेलची एक्स शोरुम किंमत १२.१० लाख रुपये आहे. जेडीएक्स मॅाडेलची ऑन किंमत १३.९२ लाख रुपये आहे. जर ग्राहकांना जेडीएक्सआई कार खरेदी करायची असेल तर , ग्राहक २ लाख रुपयांचं डाउन पेमेंट भरुन ११.९२ लाख रुपयाचं कर्ज भरु शकता. पाच वर्षासाठी असलेले ११.९२लाखांचे कर्ज ग्राहकांना ९ टक्कयांनी मिळणार आहे. जेडीएक्सआई कारवर ९ टक्के व्याजदर लागते. त्यामुळे तु्म्हाला साठ महिन्यासाठी २४,७४४ रुपये आहे.ग्राहकांना जेडएक्सआई कारसाठी २.९२ लाखांचे व्याज लागणार आहे.
मारुती सुझुकीच्या ब्रेजा जेडीएक्सआय डीटीच्या मॅाडेलची एक्स शोरुम किंमत १२.२६ लाख रुपये आहे. जेडीएक्सआई डीटी सीएनजी कारची ऑन किंमत १४,१० लाख रुपये आहे. जर ग्राहक जेडीएक्स मॅाडेलची डीटी कार खरेदी करत असतील तर, ग्राहक २लाख रपयांचे डाउन पेमेंट करु शकता.
२ लाखाच्या डाउन पेमेंटवर ग्राहकांना १२.१० लाख रुपये कर्ज मिळणार आहे. ग्राहकांकडे पाच वर्षाचा अवधी असेल तर त्यांना १२.१० लाखावर ९ टक्के व्याज लागेल. या व्याज्यावर ग्राहकांना २५ ,११८ रपयांचा EMI हप्ता भरावा लागणार आहे. ब्रेजाच्या जेडीएक्स डीटी मॅाडेलसाठी ग्राहकांना २.९७ लाख रुपये व्याज लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.