Honda City ची शानदार ऑफर; 26km मायलेज देणाऱ्या कारच्या किमतीत लाखो रुपयांचा डिस्काउंट

Honda City Tax Free: यावेळी होंडा कंपनीने आपल्या Honda City Hybrid ला MV टॅक्समधून सूट दिलीय. यामुळे या कारच्या किमतीत कपात करण्यात आलीय. जाणून घेऊ या होंडा कंपनीच्या कारचे फीचर्स.
Honda City ची शानदार ऑफर; 26km मायलेज देणाऱ्या कारच्या किमतीत लाखो रुपयांचा डिस्काउंट
Honda City Tax Free:
Published On

Honda City MV Tax Free: तुम्ही कार घेण्याचा विचारात आहात का? तर बातमी तुमच्या फायद्याची आहे. नवरात्री आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपली विक्री वाढवण्यासाठी कारच्या किमतीत कपात केलीय. Honda Cars India ने भारतात आपली विक्री वाढवण्यासाठी आपल्या कारवर खूप चांगल्या ऑफर आणि डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत.

म्हणजेच जर तुम्ही नवीन होंडा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. यावेळी होंडाने आपली Honda City Hybrid MV करमुक्त केली आहे. कारवरील इतर उपलब्ध ऑफर आणि सवलतींसह फीचर्स जाणून घेऊ.

Honda City ची शानदार ऑफर; 26km मायलेज देणाऱ्या कारच्या किमतीत लाखो रुपयांचा डिस्काउंट
मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Honda Cars India ने आपली हायब्रीड सेडान कार सिटी MV करमुक्त केली आहे. रोड टॅक्स, मोटार वाहन (MV) कर म्हणूनही ओळखला जातो. सध्या Honda City e:HEV वर MV TAX अंतर्गत रु. 2.05 लाख वाचवण्याची संधी मिळत आहे. याशिवाय या कारवर 3 वर्षांचे मोफत मेंटेनन्स पॅकेज दिले जात आहे. Honda City e:HEV ची खास गोष्ट म्हणजे ती सेल्फ चार्जिंग आहे आणि मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. म्हणूनच ही कार 26.5 किलोमीटर मायलेज देते.

News 24

26.5 किमी मायलेज

Honda City e:HEV मध्ये स्व-चार्जिंग आणि उच्च कार्यक्षम दोन इलेक्ट्रिक हायब्रीड मोटर्स आहेत. हे कारच्या 1.5L Atkinson-Cycle, i-VTEC पेट्रोल इंजिनला जोडलेले आहेत. जेणेकरून ते सर्वोत्तम इलेक्ट्रिक हायब्रीड परफॉर्मन्स देत असतात. एक लिटर पेट्रोलमध्ये कार 26.5km प्रवास करू शकते. हे इंजिन 126 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन बॅटरी चार्ज करण्यासाठी जनरेटर म्हणून काम करतं. प्युअर EV मोड किंवा ICE मोडमध्ये देखील चालू शकते, ज्यावर संगणक आपोआप स्विच करतो. कारचा टॉप स्पीड 176 किमी प्रति तास आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम, रोड डिपार्चर मिटिगेशन, ऑटो हाय बीम, ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, हिल होल्ड असिस्ट, पार्किंग होल्ड, लेन वॉच कॅमेरा, मल्टी अँगल रिअर व्ह्यू कॅमेरा, ईबीडीसह एबीएस आणि एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. होंडाची हायब्रीड सिटी कार ही मायलेज आणि कामगिरीच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com