Potato Fuel : खुशखबर! पेट्रोल-डिझेलची लवकरच सुट्टी होणार? बटाट्याच्या तेलावर धावणार वाहने, जाणून घ्या कशी?

Potato Fuel Instead of Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे वायू प्रदूषणही अफाट वाढलं आहे. अशात लवकरच बटाट्याच्या तेलावर धावणारी वाहने बाजारात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Potato Fuel Instead of Petrol Diesel
Potato FuelSaam TV
Published On

दुचाकी असो किंवा चारचाकी रस्त्यावर धावण्यासाठी वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल टाकावेच लागते. त्याशिवाय वाहने चालू शकत नाहीत. मात्र दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने याचे भावही वाढलेत. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे वायू प्रदूषणही अफाट झालं आहे. अशात लवकरच बटाट्याच्या तेलावर धावणारी वाहने बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Potato Fuel Instead of Petrol Diesel
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव काय?

पोटॅटो इंस्टीट्यूटने आखलाय प्लान

सर्वच घरांमध्ये बटाट्याची भाजी जास्तवेळा बनवली जाते. घरातील विविध पदार्थांमध्ये सुद्धा बटाटे वापरले जातात. बटाटा या कंदमुळापासून इथेनॉल तयार केलं जातं. त्यामुळे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इंस्टीट्यूटने (CPRI) ने एक प्रस्ताव आणला आहे. यामध्ये त्यांनी इथेनॉल बनवण्यासाठी बटाट्यांची जास्त लागवड केली पाहिजे असं म्हटलं आहे. यामध्ये बटाटाच्या सालींपासून इथेनॉल बनवताना परिक्षण केलं जाणार आहे, ईटी रिपोर्टशी संबंधित व्यक्तींनी याबाबत माहिती दिली आहे.

पेट्रोलनंतर डिझेलमध्ये इथेनॉल मिक्स करणार

पेट्रोल आणि डिझेल सारख्या जिवाश्म इंधनांवर पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये इथेनॉलयुक्त बायोफ्यूल वापरले जाते. भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स असते. लवकरच सरकारकडून डिझेलमध्ये देखील इथेनॉल मिक्स केले जाईल यावर विचार सुरू आहे.

बटाट्याच्या उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकावर

भारत हा बटाट्याच्या उत्पादनातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा देश आहे. इथेनॉल तयार करताना कुजलेल्या बटाट्यांचा वापर फीडस्टॉक म्हणून केला जाऊ शकतो, असं जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरणात सांगण्यात आलं आहे. अशात चीननंतर भारतात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

पेट्रोल-डिझेलसाठी दुसऱ्या इंधनाचा पर्याय असावा यासाठी सतत संधोधन आणि कामे केली जात आहेत. त्यात सध्या रस्त्यांवर इ कार आणि इ बाईक सुद्धा धावताना दिसत आहेत.

Potato Fuel Instead of Petrol Diesel
Petrol Diesel Price: गणेशोत्सवाच्या तोंडावर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले?जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com