Marriage Certificate Registration Saam Tv
बिझनेस

Marriage Certificate कसे बनवाल? ऑनलाइन रेजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Marriage Certificate Registration : विवाह प्रमाणपत्र बनवण्याचे कसे? यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? ऑनलाइन प्रोसेस काय? जाणून घ्या सविस्तर

कोमल दामुद्रे

Marriage Certificate Online Process :

सध्या देशात लग्नसराईचा काळ सुरु आहे. लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबाचे असते असे म्हटले जाते. या नात्याला आपण धार्मिक विधीनी एकत्रित बांधतो. परंतु, याला कायदेशीररित्या देखील मान्यता देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतर नावापासून ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर अनेक गोष्टी बदलतात. त्यातील महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र बनवण्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत. पण हे बनवण्याचे कसे? यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? ऑनलाइन प्रोसेस काय? जाणून घ्या सविस्तर. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्याच्या काळात लग्नाचा (Marriage) दाखला मिळणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाला कायदेशीररित्या मान्यता मिळणे. विवाह प्रमाणपत्राशिवाय मुलगा आणि मुलगी कायदेशीर पती-पत्नी नाहीत. हे प्रमाणपत्र (Certificate) मिळाल्यानंतर कायदेशीररित्या त्या नात्याला मान्यता मिळते.

याच्या मदतीने तुम्हाला अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकतो. याशिवाय विवाह किंवा घटस्फोटच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास विवाह प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. ते तयार करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करु शकता. कसे कराल? जाणून घेऊया.

1. ऑनलाइन अर्ज कसा कराल?

  • विवाह नोंदणीसाठी तुम्ही ऑनलाइन नोंदणीचा लाभ घेऊ शकता.

  • यासाठी तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साइटला (Site) भेट देऊ शकता.

  • यासाठी साइन अप करुन पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल.

  • तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल, तो भरल्यानंतर पासवर्ड टाका.

  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे विचारली जातील.

  • वधू-वरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, लग्नाचा फोटो, मोबाइल नंबर, ओळखपत्र, जन्मतारीख, आधार कार्ड, १० वी मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागतील.

  • मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर तपशील पाठवा.

  • वेबसाइटवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर इतर गोष्टींसाठी सरकारी कार्यालयात भेट देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT