WhatsApp Saam tv
बिझनेस

कोट्यवधी WhatsApp युजर्सना मोठा दणका; १ मार्चपासून बंद होणार

कोट्यवधी WhatsApp युजर्सना मोठा दणका बसणार आहे. १ मार्चपासून WhatsApp अकाउंट बंद होणार आहे.

Vishal Gangurde

१ मार्चपासून SIM-Binding नियम लागू होणार आहे

मेसेजिंग अॅप्ससाठी सिम चालू असणे अनिवार्य

सिम सुरू नसल्यास अकाऊंट बंद होण्याची शक्यता

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे महत्वाचं पाऊल उचललंय

६०-८०% छोट्या व्यवसायिकांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील कोट्यवधी WhatsApp युजर्सला मोठा दणका बसला आहे. SIM-Binding नियमाबाबत चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. आता केंद्र सरकारच्या नियमानुसार मेसेंजिग अॅप्ससाठी SIM कार्ड अकाऊंटशी जोडणे अनिवार्य असणार आहे.

सरकार १ मार्चपासून कडक पावले उचलणार आहे. दूरसंचार विभागाने DoT ने OTT मेसेजिंग अॅप्सला स्पष्ट निर्देश दिले आहे की, युजर्सला अंकाऊंट अॅक्टिव्ह SIM कार्डशी जोडणे अनिवार्य असणार आहे.

तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल, त्याच मोबाईलमध्ये WhatsApp किंवा Telegram सुरू असेल. तर ते अकाऊंट बंद होऊ शकते. भारतात WhatsApp चे सर्वाधिक युजर्स वेगवेगळ्या मोबाईलमध्ये एकाच नंबरचे WhatsApp वापरतात. आता नव्या नियमामुळे कोट्यवधी युजर्सला फटका बसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलं आहे की, 'युजर्सची सुरक्षा महत्वाची आहे. SIM-Binding च्या नियमात कोणताही बदल होणार नाही. पण सरकारने डिजिटल फसवणूक आणि बोगस नंबरच्या माध्यमातून होणारे अपराध रोखण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे'.

Sim Binding ने कोणावर काय परिणाम होणार?

जे युजर एका सिम कार्डचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हाट्सअॅप वापरतात. तसेच काही जण वारंवार सिमकार्ड बदलत असतात.

WhatsApp Web आता सहा तासानंतर लॉगआऊट होईल. ते पुन्हा सुरू करण्यासाठी QR कोड स्कॅन करावे लागेल.

60-80 टक्क्यांपर्यंत छोट्या व्यावसायिकांच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT