Mahindra Thar Earth Edition Saam Tv
बिझनेस

Mahindra ने लॉन्च केला Thar चा स्पेशल Earth Edition, जबरदस्त लूकसह मिळणार दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

Mahindra Thar Earth Edition: भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्राने आपल्या लोकप्रिय ऑफ-रोड SUV थारचे स्पेशल एडिशन अर्थ लॉन्च केले आहे

साम टिव्ही ब्युरो

Mahindra Thar Earth Edition:

भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्राने आपल्या लोकप्रिय ऑफ-रोड SUV थारचे स्पेशल एडिशन अर्थ लॉन्च केले आहे. हे व्हर्जन वाळवंटी थीमवर तयार करण्यात आलं आहे. नवीन थार काही कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे.

Mahindra Thar Earth Edition पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह ऑफर केली जात आहे. या SUV च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 15.40 लाख रुपये आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख रुपये आहे. तसेच, डिझेल व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 16.15 लाख आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 17.60 लाख (एक्स-शोरूम) आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, कंपनीची नवीन कार स्पेशल अर्थ एडिशन 'थोर डेझर्ट'शी प्रेरित आहे. महिंद्राने थार अर्थ एडिशनमध्ये फक्त काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. ज्यामुळे ही कार स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळी दिसते. ही कार LX हार्ड टॉप 4x4 लूकमध्ये 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

इंजिन

डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा थार अर्थ एडिशनला डेझर्ट फ्युरी सॅटिन मॅट पेंट आणि दरवाजांवर डून-प्रेरित डेकल्स, बी-पिलरवर अर्थ एडिशन बॅजिंग, मॅट ब्लॅक बॅज आणि सिल्व्हर अलॉय व्हील मिळतात. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा थार अर्थ एडिशनमध्ये 2.0-लीटर पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन आहेत. जे 6-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्रत्येक स्पेशल एडिशनच्या वाहनांना VIN नंबर प्लेट मिळेल. ही कार महिंद्राच्या थारचा वारसा पुढे नेणार आहे आणि त्याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT