Mahindra Bolero Saam Tv
बिझनेस

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Best 7 Seater Cars in India: Mahindra Bolero या कारवर कंपनी 1 लाखाची सूट देत आहे. यातच या कारची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही कार बाजारात नवीन मॉडेल्सवर कंपन्या डिस्काउंट जाहीर करत आहेत. यातच जर तुम्ही सेव्हन सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन, महिंद्राने आता आपल्या लोकप्रिय SUV बोलेरोवर मोठ्या प्रमाणात सूट देऊ केली आहे. ज्याचा ग्राहक या महिन्यात लाभ घेऊ शकतात. या महिन्यात महिंद्र बोलेरोवर काय ऑफर मिळत आहे, किती आहे याची किंमत आणि यात कोणते फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

किती आहे किंमत?

महिंद्रा बोलेरो डिझेल कारची एक्स-शोरूम किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.91 लाख रुपयांपर्यंत जाते. याशिवाय महिंद्रा बोलेरो निओची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपयांपासून सुरू होते. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 12.15 लाख रुपये आहे.

महिंद्रा बोलेरोवर किती आहे डिस्काउंट ?

या महिन्यात महिंद्रा बोलेरो खरेदी करून तुम्ही बरेच फायदे मिळू शकता. महिंद्रा बोलेरोच्या डिझेल मॅन्युअल B6 (O) प्रकारावर या महिन्यात 1.03 लाख रुपयांची सूट मिळत आहे. ज्यामध्ये 90,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 30,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जात आहे.

तसेच बोलेरोच्या आणखी दोन व्हेरियंटवरही मोठी सूट कंपनीने दिली आहे. बोलेरोच्या B6 व्हेरियंटवर 29,777 रुपये, तर B4 व्हेरियंटवर 24,300 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असेल.

Mahindra Bolero Neo वर किती सूट

या महिन्यात तुम्हाला बोलेरो निओवरही जबरदस्त सूट मिळेल. बोलेरोच्या N10 आणि N10 (O) डिझेल मॅन्युअल व्हेरियंटवर ही ऑफर दिली जात आहे. या प्रकारांवर 1.09 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. तर याच्या N8 व्हेरियंटवर 89,000 रुपयांची सूट दिली जात आहे. N4 च्या खरेदीवर तुम्ही 50,001 चा लाभ घेऊ शकता.

इंजिन आणि पॉवर

महिंद्रा बोलेरो ही एक मोठी 7-सीटर एसयूव्ही आहे. ज्यामध्ये तुम्हाला चांगली स्पेस मिळते. ही एक अतिशय मजबूत कार आहे. ती खराब रस्त्यांवर वेगाने धावते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बोलेरोमध्ये पॉवरफुल mHAWK75 इंजिन आहे. हे इंजिन 55.9 kW पॉवर आणि 210 Nm टॉर्क जनरेट करते. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्जची सुविधाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT