Mahila Samman Yojana: Saam Tv
बिझनेस

Mahila Samman Yojana: या महिलांना दर महिन्याला मिळतात २५०० रुपये; महिला सन्मान योजना नक्की आहे तरी काय?

Mahila Sanman Yojana of Delhi Government: दिल्ली सरकारने महिलांसाठी खास महिला सन्मान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना २५०० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. दरम्यान, केंद्र सरकारसोबतच अनेक राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी काही योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे. तशीच योजना दिल्ली सरकारनेदेखील राबवली आहे.

योजना आहे तरी काय? (Mahila Sanman Yojana)

दिल्ली सरकारने महिलांसाठी खास महिला सन्मान योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातात. या योजनेत पैसे देणार असे सांगितले होते. मात्र, अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. लवकरच हे पैसे जमा होतील, असं सांगितलं जात आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप सरकारने आश्वासन दिले होते की, महिलांसाठी खास योजना राबवली जाईल. या योजनेत त्यांना २५०० रुपये मिळतील. या योजनेची घोषणा झाली आहे. रजिस्ट्रेशनदेखील झाले आहे. आता महिला २५०० रुपयांची वाट पाहत आहेत.

पात्रता (Eligibility)

या योजनेत १८ पेक्षा जास्त वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळतो. महिला या दिल्लीच्या रहिवासी असायला हवी. महिलांकडे दिल्लीचे वोटर आयडी असायला हवे. ज्या महिला कर भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच २५०० रुपये मिळणार आहेत.

या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडे वोटर आयडी आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे दिल्लीतील आधार कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.याचसोबत बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT