Ladki Bahin Yojana  saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची चांदी! कोणाला मिळणार थेट ४५०० रुपये? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana update : राज्यातील काही लाडक्या बहिणींना थेट ४५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. या महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वककांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना १५०० रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जुलै ते मार्चपर्यंतचे २ कोटी ४१ लाख रुपये दिले आहेत. २ मे २०२५ रोजीपासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना १५०० रुपये मिळत आहेत. तर काहींना खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहेत. काही महिलांना केवळ ५०० रुपयांवर समाधान मानावं लागले आहे. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे महिना ५०० रुपये मिळाले आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया दोन मेपासून पुढील २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

कोणाला मिळाले ५०० रुपये?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता पात्र महिलांना २ मेपासून सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात ५०० रुपये देखील जमा झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काही महिला किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे फक्त ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.

कोणाला मिळणार 4500 रुपये?

राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसांचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा एकत्रिपतपणे हप्ता जमा केला होता. मात्र, काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. या सर्व महिलांच्या बँक खात्यात सरकारने २ मेपासून थेट ४५०० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT