Maharashtra government’s Ladki Bahin Scheme beneficiaries may receive ₹3,000 as a combined November–December installment saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 नाहीतर जमा होणार 3000 रुपये?

Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना या डिसेंबरमध्ये ३००० चा दुहेरी हप्ता मिळण्याची शक्यता आहे. सरकार दोन्ही महिने एकत्र जमा करू शकते, असा अंदाज आहे.

Bharat Jadhav

  • डिसेंबरमध्ये एकाचवेळी दोन हप्ते मिळणार

  • निवडणूक प्रक्रियेमुळे हप्त्यांच्या वितरणात विलंब झाल्याच म्हटलं जात आहे.

  • अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये.

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ३१ डिसेंबर आनंदाचा ठरणार आहे. त्याच कारण म्हणजे, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक सोडून दोन हप्त्याचे पैसे जमा होतील. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. बँक खात्यात १५०० रुपये नाही तर ३००० रुपये जमा होतील.

डिसेंबर महिना सुरू झाला पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. वृत्तानुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहेत. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी मिळालेला नाहीये. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमुळे अनेकांच्या खात्यात पैसे आले नसावेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती.एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. दरम्यान जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण करा.

ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.

होम पेजवरील ईकेवायसीवर क्लिक करा.

त्यानंतर ई-केवायसी फॉर्म उघडेल

आता आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा.

आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या

ओटीपीवर क्लिक करा

आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

हा ओटीपी सबमिट करा

जर ईकेवायसी अगोदरच झाले असेल तर तसा मेसेज येईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता

AhilyaNagar Crime: लग्नासाठी सततचा त्रास,लॉजमध्ये नृत्यांगनाने घेतला गळफास; भाजपच्या माजी नगरसेवकाला ठोकल्या बेड्या

Mumbai Travel : 'ख्रिसमस'चा दिवस होईल खास, जोडीदारासोबत मुंबईतील 'या' ठिकाणी घालवा निवांत वेळ

Tapovan Trees Cutting: मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा! ही लढाई कुठल्याही धर्माची नाही तर निसर्गाच्या रक्षणाची

Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

SCROLL FOR NEXT