Maharashtra Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडकीच्या खात्यात किती रूपये जमा होणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Maharashtra Ladki Bahin Yojana March installment date 2026 : लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिलांना १५०० की ३००० रुपये मिळणार?

Namdeo Kumbhar

Ladki bahin yojana march-April installment date Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याची महाराष्ट्रातील लाखो महिला वाट पाहत आहेत. मार्च महिना संपला, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, पण अद्याप १९ व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट समोर आली नाही. ईकेवायसी दुरूस्तीसाठी (Complete e-KYC ) राज्य सरकारकडून महिनाभराची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता रखडलेला असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्च-एप्रिल (March installment update) असे दोन महिन्यांचे ३००० रूपये जमा होणार की फक्त मार्च महिन्याचे १५०० येणार, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. रिपोर्ट्सनुसार, सरकारकडून मार्च महिन्यातील हप्त्याची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. (Will Women Get Double ₹3000 Payment or Just ₹1500? Key Update Inside)

लाडकीच्या खात्यात कधी जमा होणार हप्ता ? - Ladki Bahin Yojana March installment date

महाराष्ट्र सरकारकडून मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलेय. मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात १९ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे १५०० जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलनंतर निकषात असणाऱ्या महिलांच्या कात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात १५०० रूपये डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जातील. आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न असेल त्या महिलांच्याच खात्यात १५०० रूपये जमा होतील.

पात्र महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा होणार ? Will Ladki Bahin beneficiaries get 3000 rupees together

निकषात बसणाऱ्या महिलांच्या खात्यात एकाचवेळी ३००० जमा होणार असल्याचे काही बातम्या समोर आल्या आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र जमा होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून हप्ता खात्यात जमा होण्यास उशीर होत आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा होईल, असे सांगण्यात आले. पण हप्त्याला उशीर होत असला तरी दोन हप्ते एकत्र जमा होतील, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जातेय. पण यावर अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही.

Ladki Bahin Yojana : e-KYC साठी शेवटची संधी?

विधानसभेच्या तोंडावर आलेल्या या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी अथवा निकषात न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतला. पण सरकारकडून आता ईकेवायसी केली जात आहे. त्यामुळे अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांची संख्या ५० ते ६० लाखांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात सरकारकडून ईकेवासीत दुरूस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ईकेवासीतील चूक दुरूस्त करता येणार आहे. त्यानंतर मात्र ईकेवासीत दुरूस्ती करता येणार नाही. चूक असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो.

पैसे खात्यात जमा झाले की नाही? वाचा स्टेप बाय स्टेप How to check Ladki Bahin Yojana payment history online

मार्च अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती लवकरच सांगण्यात येईल. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात होईल. पण खात्यात पैसे जमा झाले का? हे अनेकांना मेसेज न आल्यामुळे समजत नाही. अथवा आपण पात्र आहोत का? हेही समजत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? याबाबतची माहिती मिळणार आहे. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. लॉगिन झाल्यावर 'अर्जाची स्थिती' (Application Status) किंवा 'पेमेंटचा इतिहास' (Payment History) या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : ना डाएट, ना औषधं; सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक, ७ दिवसांत वजनात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा खाजगी दौरा, तीन दिवस दरेगावात मुक्काम

आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, आठवडाभरातच शपथविधी, वाचा पडद्यामागे नेमकं काय सुरू?

Back Dori Blouse: लग्नसराईसाठी पैठणी किंवा साध्या साडीवर ट्राय करा हे ट्रेंडी सुंदर ७ बॅक दोरी ब्लाउज डिझाईन्स

Rahuri Election : राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! भाजप-शरद पवार गटात मुख्य लढत, हे ७ उमेदवार रिंगणात, VIDEO

SCROLL FOR NEXT