Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

how to check Ladki Bahin Yojana beneficiary list online : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीनंतर ७०-८० लाख महिलांचा १५०० रुपयांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. तुम्ही पात्र आहात का? लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana beneficiary list check online Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ दिला जातो. पण विधानसभेच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर सरकारकडून ईकेवायसी करण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ईकेवायसी करण्याची मुदत सरकारने दिली होती. पण त्यानंतर दोनवेळा केवायसी दुरूस्तीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईकेवायसीनंतर ७० ते ८० लाख महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. पण यामध्ये तुमचे नाव आहे का? हे कसे तपासणार? लाडकी बहीण योजनेत पात्र असतानाही खात्यात जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता आला नाही? त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का? असा प्रश्न लाखो महिलांना पडला असेल. तर लाडकी बहीण योजनेचा तुमचा लाभ सुरू राहणार का? हे कुठे तपासणार? जाणून घेऊयात...

₹१५०० चा लाभ बंद होणार, पण कधी?

राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला खात्यात १५०० रूपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसीची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे. मे महिन्यापासून निकषात न बसणाऱ्या अथवा अपात्र लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद होणार असल्याची माहिती 'सकाळ'ला जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून सांगण्यात आली. त्यामुळे एक मे २०२६ पासून अनेक अपात्र महिलांचा १५०० रूपयांचा लाभ बंद होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाल येणार का? कुठे तपासणार ?

ladakibahin.maharashtra.gov.in या सरकारी संकेतस्थळावर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासता येणार आहे. पण त्यासाठी या संकेतस्थळावर तुम्हाला आधी लॉगइन करावे लागले. त्यानंतर मोबाइल नंतर आणि पासवर्ड टाकावे. सर्व प्रोसेस झाल्यानंतर लाभार्थी यादी अथवा अर्जाची स्थिती, हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक अथवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे समजेल.

अपात्र कोण ठरणार?

  • कुटुंबाकडे चारचाकी वाहन

  • केंद्र किंवा राज्याच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला

  • २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला

  • ई-केवायसी न केलेल्या

  • वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर असलेल्या महिला

1500 रूपये कधीपासून बंद होणार?

ईकेवायसी करून सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची प्रत्येक निकषांनुसार पडताळणी केली. त्यामध्ये अपात्र कोण ठरले? कोणाचा लाभ बंद झाला? याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. पण मे महिन्यात ज्यांना १५०० रुपये येणार नाहीत त्या महिला निकषांत अपात्र ठरल्या, असे समजावे लागेल असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

Maharashtra News Live Update: पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT