Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशांबाबत सरकारचा मोठा झटका; 'या' महिलांवर होणार थेट कारवाई

Maharashtra Ladki Bahin Yojana latest update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. अपात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana, Maharashtra Government : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांबाबत राज्य सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आणि बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.

महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, अपात्र व्यक्तींनी घेतलेला निधी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेच्या नियमांनुसार वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कुटुंब किंवा सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. असे असूनही काही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पुरुषांनीही घेतला लाभ; महसूल कायद्यानुसार होणार वसुली

योजनेच्या छाननीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली असून, काही पुरुष अर्जदारांनी बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटले आहेत. अशा पुरुषांकडून जमीन महसूल कायद्यातील तरतुदींनुसार (Land Revenue Laws) पैशांची वसुली करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

e-KYC न करणाऱ्यांची मदत थांबवली

बँक खात्यांची पडताळणी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी e-KYC बंधनकारक केले होते. ज्या महिलांनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे बँक हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बँक खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांपर्यंतच या योजनेचा पैसा पोहोचावा, यासाठी ही कडक कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : सकाळच्या नाश्त्याला १० मिनिटांत बनवा 'ही' रेसिपी, झपाट्याने वजन होईल कमी

Maharashtra News Live Update: सहा खासदार फुटीनंतर शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज वाशिमच्या दौऱ्यावर

Crime : नागपुरात थरार! घटस्फोटाचा निकाल लागताच २४ वर्षीय तरुणीची हत्या; भररस्त्यात गळा, पोटावर सपासप वार

Rain Alert : मुंबईसह २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे; वाचा IMD चा अंदाज

Kidney damage: डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी पेनकिलर घेताय? किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे 3 धोकादायक संकेत

SCROLL FOR NEXT