Women beneficiaries completing eKYC for the Chief Minister’s Ladki Bahin Yojana at a service centre in Maharashtra. Saam tv
बिझनेस

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Ladki Bahin Yojana eKYC: महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झालाय. कारण ३१ डिसेंबरची अंतिम मुदत संपल्यानंतरही ईकेवायसी सेवा सक्रिय आहेत. तसेच अहवालात ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ सुचवण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य

  • ३१ डिसेंबर अंतिम मुदत असूनही सुविधा सुरू

  • ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढीची चर्चा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेचे लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक आहे. केवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही ई-केवायसी सुविधा सुरूच आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपर्यंत ई-केवायसी करण्याचे मुदत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाला अद्याप याबद्दल अधिकृत पत्र मिळालेले नाहीये. ई-केवायसी सुविधा सुरूच असल्यानं प्रक्रियेबाबत महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं. ही प्रक्रिया १८ सप्टेंबर रोजी सुरू झाली. सुरुवातीला अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती. मात्र निर्धारित वेळेत त्यांचे ई-केवायसी पूर्ण झाल्या नसल्यानं विभागाने ही अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली असली तरी मोठ्या संख्येने महिलांच्या ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आलंय.

ग्रामीण भागात, तांत्रिक समस्या, इंटरनेट समस्या, माहितीचा अभाव आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांचे ई-केवायसी पूर्ण करता आले नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. त्यानुसार ई-केवायसी आता ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करता येईल असे संकेत आहेत. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची आवश्यकता लागू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT