Ladki Bahin Yojana  Saamtv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: पैसा लाटणाऱ्या ९५२६ कर्मचाऱ्यांकडून होणार वसुली; बोगस लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई

Ladki Bahin Yojana Government Employees Take Benefits: महाराष्ट्राच्या लाडकी बहिन योजनेत मोठा गोंधळ उडालाय. ९,५२६ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे योजनेचा लाभ घेतलाय. आता राज्य सरकार त्यांच्याकडून पैशांची वसुली करणार आहे.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • ९५२६ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य अर्ज करून योजना लाभ घेतला.

  • सरकार या बोगस लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार आहे.

  • दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे.

महायुती सरकारची महत्त्वकांक्षी 'लाडकी बहीण योजने'चा काही बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याची बाब समोर आलीय. सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींनीही योजनेचा अर्ज भरत योजनेचा पैसा लाटला. आता सरकार या,अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार आहे. ९५२६ महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. आता त्यांच्याकडून वसूली केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. (Bogus Beneficiaries Exposed In Ladki Bahin Yojana: Maharashtra Govt To Recover Funds)

सरकारी नोकरीला असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश सामान्य प्रशासकीय विभागाने सर्व विभागांना दिलेत. दरम्यान ९५२६ महिला कर्मचाऱ्यांनी दहा महिन्यात लाडकी बहीण योजनेतून तब्बल साडेचौदा हजार कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने घेतले.

आता महिलांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सरकार या महिलांच्या खात्यात योजनेचा जितका पैसा जमा झालाय तितका पैसा त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर या महिलांना दंड देखील ठोठवला जाणार असल्याची शक्यता आहे. सरकारचा पैसा लाटण्यासंदर्भात त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आलीय. त्यांच्याकडून वसुली केली जाणार असल्याची माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय.

सरकारी सेवेत असणाऱ्या अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर काहींनी स्वखुशीनं रक्कम परत केली. तर उर्वरितांकडून आता सक्तीने वसुली केली जात आहे. फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल, अपात्रांनी लाभ घेतल्यास कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. ही योजना गरजवंतांसाठी आहे, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेचा गैरवापर नेमका कसा झाला?

९५२६ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी अयोग्यरीत्या अर्ज भरून लाभ घेतला असून ते नियमबाह्य ठरले आहेत.

सरकार काय कारवाई करणार आहे?

या सर्व बोगस लाभार्थ्यांकडून निधी परत मागवण्यात येणार असून दंडात्मक कारवाईही होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होती का?

नाही, लाडकी बहीण योजनेत सरकारी सेवा करणाऱ्या महिलांना लाभ घेण्याची परवानगी नाही.

लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली होती ज्यात पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT