Government Scheme saam Tv
बिझनेस

Government Scheme: बारावी, आयटीआय अन् डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ₹१०,०००; सरकारची नेमकी योजना आहे तरी काय?

Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. याअंतर्गत तरुणांना नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळणार आहे. याचसोबत विद्यावेतनदेखील मिळणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

तरुणांना मिळणार नोकरीपूर्व प्रशिक्षण

११ महिन्यांसाठी प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळणार

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत.अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेतून तरुणांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना नोकरीपूर्व प्रशिक्षण घेता येणार आहे. नुकतेच बारावी, पदवी, मास्टर्स आणि डिप्लोमाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर या विद्यार्थ्यांना ११ महिन्यासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तरुणांना कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचसोबत विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला ६ हजार रुपये, आयटीआय, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये, पदवीधर आणि मास्टर्स केलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जाणार आहे. त्यामळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना प्रशिक्षण आणि त्याचा मोबदलादेखील मिळणार आहे.

अनेकदा शिक्षण झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळत नाही. अनुभव नसल्याने नोकरी आणि पगारदेखील जास्त मिळत नाही. त्यामुळेच ही योजना सुर केली आहे. यामध्ये आधी शासकीय, निमशासकीय, बँकेत नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी होती. मात्र, आता खाजगी उद्योगांमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर विद्यावेतनदेखील मिळणार आहे.

असं करा रजिस्ट्रेशन

तुम्हाला rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ई मेल आयडी टाकावा लागणार आहे. स्वतः चे नाव, मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाका. यानंतर तुम्हाला काही दिवसांनी मेसेज येईल. यानंतर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जाऊनही चौकशी करता येते. यानंतर तुम्हाला नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT