Majhi Kanya Bhagyashree SaamTv
बिझनेस

Majhi Kanya Bhagyashree: मुलगी जन्माला येताच 'लखपती' होणार; राज्य सरकारच्या 'या' योजनेचा लाभ कसा घ्याल?

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास योजना राबवली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलींना जन्मानंतर लाखो रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात मुलींसाठी काही विशेष योजना राबवल्या आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून काही योजना राबवल्या जातात.महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी खास योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून ५०,००० रुपये मिळतात.

केंद्र सरकारने २०१६ साली मुलींसाठी खास योजना राबवली आहे.या योजनेत मुलींच्या जन्मावेळी पालकांना ५०,००० रुपये दिले जातात. या योजनेत विमा संरक्षणही दिले जाते. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाते. त्यांना १ लाख रुपयांना अपघात विमा आणि ५० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर त्यांना ५० हजार रुपये दिले जाणार आहे. दोन मुलींच्या जन्मानंतर जर शस्त्रक्रिया केली तर २५,०००-२५,००० रुपये दिले जाणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम ही मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली तसेच एपीएल पांढरे रेश कार्डधारक लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच मुलगी अविवाहित असावी. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर अनुदान देण्यात येते. मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर ७५ हजार रुपये दिले जातात.

अर्ज कसा करावा?

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत स्थान; शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर आंदोलन|VIDEO

Shocking News: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये हात घातला अन्..., काही सेकंदात तरुणाचा मृत्यू; पाहा VIDEO

Satara Hill Station: सोलापूरजवळ आहे 'हे' निसर्गरम्य हिल स्टेशन, परदेशी पर्यटकांसाठी स्वर्गसदृश सुंदर पर्यटनस्थळ

'ते म्हणजे दुतोंडी गांडूळ', शिंदेसेनेच्या खासदाराला संजय राऊतांनी डिवचलं

Bhayandar : तलावात पोहण्यासाठी उडी मारली तो वर आलाच नाही; भाईंदरच्या वरसावे तलावातील घटना

SCROLL FOR NEXT