Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: मुलींना मिळणार १ लाख रूपये, पात्रता काय? कोणती कागदपत्रे लागणार? बघा

Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना १ लाख रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेदेखील अनेक योजना राबवल्या आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहेत. दरम्यान, त्याआधीही मुलींसाठी एक खास योजना राबवली होती. सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाते. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, मुलींना उच्चशिक्षण मिळावे आणि बालविवाह होऊ नये, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलींना १८ वर्ष होईपर्यंत १ लाख रुपयांची मदत केली जाते. (Lek Ladki Yojana)

लेक लाडकी योजना

या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मावेळी ५००० रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६००० रुपये दिले जातात. मुलगी सहावीत गेल्यानंतर ७००० रुपये दिले जातात. त्यानंतर तुमची मुलगी कॉलेजला गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. यानंतर तुमची मुलगी जेव्हा १८ वर्षांची होते तेव्हा ७५००० रुपये दिले जातात. त्यामुळे मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत १,०१००० रुपये दिले जातात. (Lek Ladki Yojana Scheme For Girls)

योजनेची पात्रता (Lek Ladki Yojana Eligibility)

लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना लाभ मिळणार आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT