Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: लाडकी बहीणनंतर आता मुलींसाठी 'लेक लाडकी' योजना; मिळणार तब्बल १ लाखांची मदत, कसा घेता येईल लाभ? जाणून घ्या...

Maharashtra Government Lek Ladki Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना लागू आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत केली जाते.

Siddhi Hande

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. परंतु याच योजनेसोबत मुलींसाठीही एक योजना राबवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी ही योजना मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी राबवण्यात आली आहे. लेक लाडकी योजना नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ रोजी माझी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर लेक लाडकी योजना सुरु केली होती. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाते. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये दिले जातात. इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यानंतर ६ हजार रुपये दिले जातात. मुलगी सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये दिले जातात. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्यात येईल. लाभार्थी मुलीला एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.

योजनेच्या अटी काय?

पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांच्या कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. एका घरातील दोन मुलींसाठी या योजनेत अर्ज करता येतो. लाभार्थी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थीचा जन्मदाखला, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासबुक, रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्रे ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT