Government LPG Support google
बिझनेस

LPG Rate Today : एलपीजी सिलिंडरवर सरकार देतंय तब्बल ७०० रुपयांची सबसिडी? समोर आली मोठी माहिती

Domestic LPG Price Today : आज जुलै २४ रोजी LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने वाढत्या जागतिक किमती असूनही घरगुती गॅस कमी दरात उपलब्ध ठेवत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

Sakshi Sunil Jadhav

जुलै २४ रोजी घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात LPG च्या किंमती वाढलेल्या असतानाही देशातल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर कमी किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना महागाईचा जास्तीत जास्त भार सहन करावा लागत नाही.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत सांगितलं की, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात LPG च्या किमती वाढलेल्या आहेत. तरीही सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, जून २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची बाजारभावानुसार किंमत १६९५ रुपये इतकी होती. मात्र ग्राहकांना तो सिलेंडर फक्त ९४२ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. म्हणजेच प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांपेक्षा जास्तीचा भार सरकार आणि सरकारी तेल कंपन्या उचलतात.

आजचे LPG सिलेंडरचे दर

सध्या दिल्लीमध्ये घरगुती LPG सिलेंडरची किंमत ९४२ रुपये असून व्यावसायिक सिलेंडर २९३० रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर ९४१.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर २८८२ रुपये आहे. तर बेंगळुरूमध्ये घरगुती सिलेंडर ९४८.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर ३००६ रुपयांना मिळणार आहे.

सरकारने असंही स्पष्ट केलं की, आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि २०२६ - २७ दरम्यान तेल विपणन कंपन्यांना या सवलतीसाठी सुमारे ३०००० कोटी रुपयांची भरपाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढत्या आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम सहन करावा लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT