LPG Price Fall Saam Tv
बिझनेस

LPG Price Fall: दिलासादायक बातमी! LPG गॅसच्या किंमती घसरल्या; वाचा आजचे नवे दर

LPG Gas Price Fall: मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमतीत हे बदल झाले आहेत.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज एलपीजी गॅसच्या (LPG Price Fall) किंमतीत कपात झाली आहे. १९ किलोच्या एलपीजी कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमतीत १७ रुपयांनी कपात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतो. कमर्शियल गॅस सिलिंडरचे भाव वाढतात किंवा कमी होतात. दरम्यान, आज या भावामध्ये कपात झाली आहे. आज १ मे रोजी मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत १६९९ रुपये झाली आहे. ही किंमत १७१३.५० रुपये होती. त्यामुळे व्यवसायिकांना, हॉटेलमालकांना याचा फायदा होणार आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम होणार नाही.

कोलकत्त्यात कमर्शियल सिलिंडर १८६८ रुपयांवरुन १८५१.५० रुपये झाली आहे. चेन्नईत गॅस सिलिंडरची किंमत १९०६.५० रुपये झाली आहे. ही किंमत १९२१.५० रुपये होती. तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत ८५२.२० रुपये झाली आहे.

गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिाकांवर याचा परिणाम होणार नाही. परंतु व्यावसायिक, हॉटेलमालक जे लोक जास्त प्रमाणात गॅस सिलिंडरचा वापर करतात त्यांच्या परिणाम होणार आहे. त्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT