LPG Gas Price Saam Tv
बिझनेस

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

LPG Gas Price: नवरात्रीपूर्वी सामान्यांना दिलासा मिळणार आहे. २२ सप्टेंबरपासून GST निर्णय लागू होणार असून खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत.

Manasvi Choudhary

सर्वसामान्यांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून जीवनाश्यक वस्तूच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. अन्न पदार्थापासून ते इलेक्ट्रिक वस्तूच्या किंमती स्वस्त होणार आहेत. LPG गॅस देखील स्वस्त होणार आहे की नाही याबाबत अनेक गृहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3 सप्टेंबर रोजी GST काउन्सिलची बैठक झाली . या बैठकीमध्ये GST संबंधित नवीन निर्णय घेण्यात आला. GST चे 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब काढून केवळ दोन स्लॅब 5 टक्के आणि 18 टक्के ठेवण्यात आला आहे. यानुसार खाद्यपदार्थांपासून ते कपडे, इलेक्ट्रीक वस्तूंवरचे दर कमी झाले आहेत. जे येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

नवीन GST निर्णयानुसार, २२ सप्टेंबरपासून सामान्य जीवनाश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. घरगुती एलपीजी गॅस आणि व्यवसायिक गॅस सरकार वेगवेगळे जीएसटी दर आकारते. घरगुती गॅसवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. तर व्यवसायिक गॅसवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. GST काउन्सिलच्या निर्णयानुसार एलपीजी गॅसवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही अद्याप याबाबत कोणतीही माहिती नाही. २२ सप्टेंबर रोजी याबाबत माहिती समोर येईल.

या वस्तू होणार स्वस्त

3 सप्टेंबर रोजी झालेल्या GST काउन्सिलच्या निर्णयानुसार जीवनाश्यक वस्तू म्हणजे आरोग्यसेवा, शैक्षणिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विमा, ऑटोमोबाईल वस्तू जीएसटी दर कमी केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT