User checking mobile phone after failing to receive OTP for LPG gas booking saam tv
बिझनेस

सिलिंडर बुकिंग केल्यावर OTP येत नाहीये? 'हे' काम लगेच करा, मिनिटांत होईल गॅस बुक

LPG Cylinder Booking Failed Due To OTP Issue? Solve It In Minutes: LPG गॅस बुकिंग करताना OTP येत नाहीये? नेटवर्क, DND, सर्व्हर किंवा SMS सेटिंगमुळे होणारी समस्या काही मिनिटांत कशी सोडवायची ते जाणून घ्या. सोप्या उपायांसह पर्यायी बुकिंग पद्धतीही येथे दिल्या आहेत.

Omkar Sonawane

LPG गॅस सिलिंडर बुक करताना मोबाईलवर OTP येत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेकजणांनी अशी तक्रार केली आहे की OTP उशिरा मिळतो किंवा अजिबात येत नाही. त्यामुळे बुकिंग प्रक्रिया करताना मोठा अडथळा निर्माण होतो. पण प्रत्येकवेळी यासाठी LPG सिलिंडर बुकिंग करताना OTP मिळत नसेल तर खालील 5 महत्वाचा गोष्टी नक्की तपासा

1. नेटवर्कची समस्या

खराब मोबाईल नेटवर्क हे OTP न येण्याचे मुख्य कारण असू शकते. रेंज कमी जास्त होत असेल किंवा इंटरनेट व्यवस्थित चालत नसेल, तर OTP उशिरा येतो किंवा येतच नाही.

2. DND ऑन असणे

फोनमध्ये DND फीचर सुरू असल्यास कॉल आणि मेसेज ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे OTP देखील येत नाही. त्यामुळे फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन DND बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

3. LPG कंपनीचा सर्व्हर डाउन असणे

कधी कधी एकाच वेळी जास्त लॉक बुकिंग करत असल्याने कंपनीचा सर्व्हर स्लो किंवा डाउन होतो. त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.

4. SMS इनबॉक्स फुल असणे

मोबाईलमध्ये जुने मेसेज जास्त असल्यास नवीन मेसेज येण्यास अडथळा येतो. त्यामुळे जुने SMS डिलीट करून इनबॉक्समध्ये जागा मोकळी करा.

5. OTP स्पॅम फोल्डरमध्ये जाणे

काही स्मार्टफोन्स OTP मेसेजला स्पॅम किंवा जंक फोल्डरमध्ये पाठवतात म्हणून Spam किंवा Junk SMS फोल्डर तपासा.

OTP न आल्यास बुकिंगचे पर्याय

जर OTP ची समस्या कायम राहिली, तर तुम्ही खालील पर्याय वापरू शकता:

IVR कॉलद्वारे बुकिंग

WhatsApp द्वारे बुकिंग

थेट गॅस एजन्सीला भेट देऊन बुकिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT