LPG Cylinder Gas Booking Rules Saam Tv
बिझनेस

LPG गॅस सिलिंडरचे नियम बदलले, १ जुलैपर्यंत हे काम कराच अन्यथा बुकिंग नाही, PNG आता अनिवार्य

LPG cylinder rules : एलपीजी गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून पीएनजी कनेक्शन अनिवार्य करण्यात आले आहे. १ जुलैपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस बुकिंग बंद होणार आहे. नवीन नियमांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gas Cylinder Booking Rules Change : पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅससाठी नवीन नियम जारी केले आहेत. ज्या परिसरात पीएनजी कनेक्शन आहे, तिथे यापुढे एलपीजी गॅस सिलिंडर बंद होणार आहे. १ जुलैपासून त्या परिसरात एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्याशिवाय ज्या व्यक्तीकडे एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी आपले एलपीजी कनेक्शन बंद करावे, असा थेट नियम जारी करण्यात आला आहे. ज्या घरात एलपीजी आणि पीएनजी ही दोन्ही कनेक्शन आहेत, त्या घरात १ जुलैपासीनू एलपीजी सप्लाय कायमची बंद केली जाणार आहे. त्यांना फक्त आणि फक्त पीएनजीचाच वापर करावा लागणार आहे. सरकारकडून दोन्ही कनेक्शन असणाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार कुणालाही एलपीजी आणि पीएनजी हे दोन्ही कनेक्शन ठेवता येणार नाहीत. (how to switch from LPG to PNG connection)

... तर पीएनजी कनेक्शन अनिवार्य

शहरात, परिसरात अथवा तुमच्या जवळ पीएनजीची गॅस पाईपलाइन असेल तर त्या ठिकाणाच्या लोकांना यापुढे पीएनजी कनेक्शन घेणं अनिवार्य करण्यात आले आहे. घराच्या ३०० मीटरच्या अंतरावर पीएनजी लाइन असेल तर ग्राहकांना एका आठवड्याच्या आत कनेक्शन मिळू शकते. नव्या कनेक्शनसाठी सहा हजार रूपयांपर्यंतची रक्कम भरावी लागणार आहे.

... पीएनजी कनेक्शन घ्या अन्यथा

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक शहरात पीएनजी कनेक्शन उपलब्ध आहेत. पण अनेक ठिकाणी पीएनजी असतानीही एलपीजी गॅस सिलिंडरच वापरला जातो. त्या सर्व ग्राहकांना आता १ जुलैपर्यंतची डेडलाइन देण्यात आलेली आहे. जर पीएनजी कनेक्शन घेतलं नाही तर एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग बंद केली जाणार आहे. तुमच्या परिसरात पीएनजी लाईन असेल तर शक्य तितक्या लवकर कनेक्शन घ्यावे. एलपीजी परत करण्यासाठी ग्रीन गॅस किंवा ऑनलाइन पोर्टलचा वापर करता येतो.

काळा बाजार रोखण्यावर भर -

एलपीजीचा घरगुती पुरवठा सामान्य आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. पण लोकांच्या मते, ९२५ रूपयांचा गॅस काळ्या बाजारात २ ते अडीच हजार रूपयांना मिळत आहे. त्याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात ६ ते सात हजार रूपयांना मिळत असल्याची परिस्थिती आहे. हाच काळा बाजार रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: हात-पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला...; १३ वर्षीय मुलीवर ५ जणांचा सामूहिक बलात्कार

Maharashtra News Live Update:आरोग्य उपसंचालकांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयातील बातमीची दखल

Crispy Potato Fry Recipe: संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत मसाला बटाटा, तोडांला येईल तिखट चव

वर्गातल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार,पीडितेसह पालकांनी शिक्षकाला भर चौकात चोपला, पोलिसांकडूनही कारवाई

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, अश्लील व्हिडिओची १५ ते २० रूपयांत विक्री

SCROLL FOR NEXT