LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबरपासून सबसिडीच्या घरगुती LPG सिलिंडसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (BAA) अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अजून आधार ऑथेंटिकेशन केलेलं नाही, त्यांच्या LPG सिलिंडरची डिलिव्हरी बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ऑथेंटिकेशन न केलेल्या ग्राहकांची LPG डिलिव्हरी थेट बंद केली जाणार नाही.
अशा ग्राहकांना संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीच्या डिजिटल माध्यमातून नोंदणी करावी लागेल. यामध्ये IVRS, WhatsApp Chatbot, मोबाइल अॅप आणि ग्राहक वेबसाइटचा समावेश आहे. नोंदणी केल्यानंतर स्थानिक उपलब्धतेनुसार ५ किंवा १० किलोचा Lpg सिलिंडर बाजारभावाने, म्हणजेच सबसिडीशिवाय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळीही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येईल. डिलिव्हरी कर्मचारी OMCच्या मोबाइल अॅपद्वारे ही प्रोसेस पूर्ण करू शकतो. तसेच ग्राहक आपल्या LPG वितरकाच्या दुकानात जाऊन किंवा घरबसल्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून e-KYC करू शकतात. इंडेन ग्राहकांसाठी IndianOilOne, भारत गॅस ग्राहकांसाठी HelloBPCL आणि HP Gas ग्राहकांसाठी HP Pay अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, या प्रक्रियेचा उद्देश सबसिडीचा लाभ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, डुप्लिकेट किंवा अपात्र कनेक्शन शोधणे आणि सब्सिडीच्या LPG सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखणे हा आहे. दरम्यान, ऑथेंटिकेशनसाठीची अंतिम मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली होती. ग्राहकांना ३० जूनपासून पुढे ३१ जुलै, ७ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ७ सप्टेंबर आणि अखेर १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरवर अंदाजे ₹२१० इतकी अंतर्निहित सब्सिडी होती. त्यामुळे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.