LPG cylinder price google
बिझनेस

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Ujjwala Yojana : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात एलपीजी ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढील माहितीत आपण पीएम उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबासाठी एलपीजीचे दर किती असतील आणि आजचे इतर शहरांचे दर किती असतील? हे जाणून घेणार आहोत.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांना महागाईमुळे चांगलाच भटका बसला आहे. सोनं-चांदी तर लांबचीच गोष्ट पण रोजच्या वापरातल्या LPG गॅस सिलेंडरचे दर आता गगनाला भिडताना दिसत आहेत. पश्चिम आशियाच्या वाढत्या ताणामुळे महागाई वाढताना दिसत आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना पुरवठा खर्चापेक्षा ६५८ रुपये स्वस्त दरात सिलेंडर मिळतो. जे लोक उज्जवला योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी सिलेंडरची किंमत बी ९५८ रुपये आहे.

१४. २ किलो घरगुती वापराचा सिलेंडर पुरवठ्याची किंमत ही आता १,६०० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. ही किंमत आधी १२०० रुपये होती. हा सिलेंडर दिल्लीतील सर्वसामान्य लोक ९४२ रुपयांना विकत घेत आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) चा लाभ घेणारे नागरिक हे पहिल्या चार रिफीलवर सबसिडी मिळाल्यानंतर फक्त ६४२ रुपयांना सिलेंडर विकत घेत आहेत. अशी माहिती मोदी सरकारने दिली आहे.

सिलेंडरच्या किमतीत रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ७ मार्च रोजी नुकतीच LPG सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ केली होती. त्यात रविवारी आणखी भर पडली हे दर २९ रुपयांनी वाढले. आता १४.२ किलोचा सिलेंडर हा ९४२ रुपयांना मिळणार आहे. याआधी याची किंमत ९१३ होती. पुढील माहितीत आपण विविध शहरांमधले LPG सिलेंडरचे दर जाणून घेणार आहोत.

मुंबईतील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 941.50

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,067.50

दिल्लीतील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 942.00

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,113.50

चैन्नईतील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 957.50

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,283.00

लखनऊमधील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 979.50

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,236.00

पुण्यातील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 945.00

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,128.00

ठाण्यातील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 941.50

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,069.50

नाशिकमधील आजचा LPG सिलेंडरचा दर

14 किलोच्या सिलेंडरचा दर - 945.50

19 किलोच्या सिलेंडरचा दर - 3,143.50

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Maharashtra News Live Update: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT