LPG सिलेंडर बुक केल्यानंतर तो घरी कधी पोहोचेल याची आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच सिलेंडरची लाईव्ह लोकेशन, डिलीव्हरी स्टेटस आणि अंदाजे पोहोचवण्याचे वेळ सहज तपासू शकता. इराण आणि इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम आजही अनेक भागांत दिसून येत आहे. काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सिलेंडर डिलिव्हरी उशिरा होत आहे. त्यामुळे सिलेंडर बुक केल्यानंतर ते नेमके कधी मिळणार हा प्रश्न ग्राहकांना पडतो. मात्र आता काळजी करण्याचे काम नाही. कारण तुम्ही घरबसल्या तुमच्या सिलेंडरची स्थिती तपासू शकता.
गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे सिलेंडर बुक झाला आहे का, डिस्पॅच झाला आहे का किंवा डिलिव्हरीसाठी निघाला आहे का याची माहिती मिळते. त्यामुळे डिलिव्हरीबाबतची अनिश्चितता कमी होते.
मोबाईल अॅपद्वारे ट्रॅकिंग
Indane, HP Gas आणि Bharat Gas या कंपन्यांचे अधिकृत मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ग्राहकांनी हे अॅप डाउनलोड करून आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करावे.
लॉगिन केल्यानंतर My Booking, Track Cylinder अशा पर्यायांमध्ये जाऊन तुम्ही बुक केलेल्या सिलेंडरची स्थिती पाहू शकता. येथे बुकिंगची तारीख, डिस्पॅच अपडेट आणि डिलिव्हरीशी संबंधित माहिती दिसते.
वेबसाइटवरूनही मिळेल माहिती
जर तुम्हाला अॅप वापरायचे नसेल, तर संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही सिलेंडर ट्रॅक करता येतो. यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा LPG ID आवश्यक असते. माहिती भरल्यानंतर स्क्रीनवर सिलेंडरची सध्याची स्थिती दिसते.
SMS आणि कॉलद्वारेही तपासा स्टेटस
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ते SMS आणि IVRS सेवेद्वारेही माहिती मिळवू शकतात. बुकिंगवेळी मिळणाऱ्या मेसेजद्वारे अपडेट मिळत राहतात. तसेच IVRS नंबरवर कॉल करूनही ग्राहक सिलेंडरची स्थिती जाणून घेऊ शकतात.
Indane Gas: 7718955555
HP Gas: 7903105555
Bharat Gas: 7715012345
या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग, रवाना झाले की नाही आणि डिलिव्हरीबाबतची माहिती सहज मिळवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.