housing society NOC mandatory for liquor shop licence Maharashtra Saam TV marathi (AI image)
बिझनेस

Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

Housing Society NOC for Liquor Shop : महाराष्ट्रात गृहनिर्माण सोसायटीच्या हद्दीत किंवा निवासी इमारतीत दारूचे दुकान सुरू करण्यासाठी सोसायटीचे NOC अनिवार्य करण्यात आल्याची माहिती आहे. FL-2 आणि CL-3 परवान्यांसाठी नव्या नियमांचा काय परिणाम होणार, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra new rules for liquor shops near housing societies : तुमच्या गृहनिर्माण संस्थेच्या (Housing Society) अगदी शेजारी किंवा इमारतीत दारूचे दुकान उघडले जाणार असेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने नियमांतील एक मोठी त्रुटी (Loophole) दूर करत गृहनिर्माण सोसायट्यांना सर्वात मोठा अधिकार दिला आहे. नव्या निर्णयानुसार कोणत्याही गृहनिर्माण संस्थेच्या हद्दीत किंवा लागून दारूचे दुकान सुरू करायचे असल्यास संबंधित सोसायटीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घेणे दारू दुकानदारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

गृहनिर्माण संस्थेने जर दारूचे दुकान उघडण्यास नकार दिला किंवा एनओसी (NOC) दिली नाही, तर संबंधित दुकानदाराला दारू विक्रीचा परवाना (Licence) दिला जाणार नाही. याआधी नियमांमधील त्रुटीचा फायदा घेऊन अनेक दुकानदार सोसायट्यांचा विरोध असतानाही दुकाने सुरू करत होते. त्यामुळेमुळे रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. पण आता राज्य सरकारच्या या नवीन निर्णयामुळे आता सोसायट्यांना 'व्हिटो पॉवर' (निर्णायक अधिकार) मिळाला आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गृह विभागाच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या दारू विक्रेत्याला आपले दुकान निवासी इमारतीत सुरू करायचे असेल तर त्याला तेथील गृहनिर्माण संस्थेचे (Housing Society) 'ना-हरकत प्रमाणपत्र' (NOC) घेणे बंधनकारक असणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये इमारतींच्या तळमजल्यावर दारूची दुकाने उघडल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

सुरक्षेचा प्रश्न, होणारी गर्दी, बेकायदेशीर पार्किंग आणि शांततेचा भंग यांमुळे रहिवासी व दारू विक्रेत्यांमध्ये नेहमी वाद होत असत. याआधी नियमांमधील त्रुटींचा फायदा घेऊन दुकानदार मंजुरी मिळवत होते. एकदा दुकान सुरू झाले की रहिवाशांकडे विरोध करण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग नव्हता. पण आता सरकारच्या या नवीन निर्णयामुळे सोसायट्यांना मोठा अधिकार मिळाला आहे.

नवीन नियमांमुळे दारू व्यापाऱ्यांकडून पूर्वी घेतला जाणारा कायद्यातील त्रुटींचा गैरफायदा आता पूर्णपणे बंद झाला आहे. '२०२६ सुधारणा नियमां'नुसार महाराष्ट्र सरकारने 'बॉम्बे विदेशी दारू नियम, १९५३' आणि 'महाराष्ट्र देशी दारू नियम, १९७३' या दोन्ही जुन्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार आता FL-2 (विदेशी दारूची किरकोळ विक्री) आणि CL-3 (देशी दारूची विक्री) या दोन्ही परवान्यांसाठी (Licences) गृहनिर्माण सोसायटीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घेणे थेट आणि स्पष्टपणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबईत अनेकदा इमारतींचे वरचे मजले बांधून पूर्ण होईपर्यंत बिल्डर खालचे मजले किंवा दुकाने वापरण्यासाठी आधीच ताब्यात देतात. अशा वेळी फ्लॅट खरेदीदारांची अधिकृत सोसायटी किंवा व्यवस्थापन समिती (Managing Committee) स्थापन झालेली नसते. याचाच फायदा घेऊन अनेक दारू विक्रेते रहिवाशांची परवानगी न घेताच गुपचूप दुकाने सुरू करत होते. पण आता 'आंशिक ताबा' (POC) मिळाल्याच्या टप्प्यावरच सोसायटीची 'ना हरकत' अनिवार्य केल्यामुळे फ्लॅट खरेदीदार आणि रहिवासी एकत्र येण्यापूर्वीच होणाऱ्या दारू दुकानदारांच्या अशा मनमानीला ब्रेक लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer cases increasing: कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस का वाढत आहेत? डॉक्टरांनी सांगितली 5 मोठी आणि धक्कादायक कारणं

NEET पेपर २०२६ कसा फुटला? NTA च्या तज्ज्ञांनीच रचला कट; A to Z टाइमलाईन समोर

हाडे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी या 6 भाज्या ठरतील फायदेशीर, आजपासूनच आहारात करा समावेश

Heart Attack - BP : श्रावणात उपवास करताय? हृदयविकार अन् हाय बीपीच्या रुग्णांनी 'ही' घ्या खबरदारी, नाहीतर जीवाचा धोका वाढेल

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

SCROLL FOR NEXT