LIC Scheme Saam TV
बिझनेस

LIC Pension Scheme: तुम्हालाही महिन्याला १० हजारांची पेन्शन मिळणार, LIC ची जबरदस्त योजना, फक्त एकदाच गुंतवा इतके पैसे

LIC Smart Pension Scheme: एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कधीच आर्थिक अडचण येणार नाही. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला १०,००० रुपयांची पेन्शन मिळू शकते.

Siddhi Hande

एलआयसी स्मार्ट पेन्शन स्कीम

महिन्याला मिळणार १०,००० रुपयांची पेन्शन

एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. भविष्यात आर्थिक अडचण भासू नये, यासाठी आतापासूनच आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही जर तुमचे पैसे योग्य स्कीममध्ये गुंतवले तर भविष्यात कधीच पैशांची अडचण येणार नाही. तुम्ही एलआयसीच्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल.

एलआयसीने अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधील काही योजनांमध्ये फक्त विमा कव्हर दिला जातो. तर काही योजनांमध्ये विम्यासोबतच चांगला फंडदेखील दिला जातो.एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे. हा एक इमिडिएट अॅन्युटी प्लान आहे. यामध्ये फक्त एकदा गुंतवणूक करुन तुम्ही आयुष्यभरासाठी पेन्शन मिळवू शकता.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना ही खूप योग्य आहे. ज्या लोकांना शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची वाटते ते या योजनेत गुंतवणूक करु शकतात. ही एक नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग एलायसी प्लान आहे. या योजनेत कोणतीही जोखिम नसते.

एलआयसीच्या या योजनेत तुम्ही कमीत कमी १ लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी करु शकता. जास्तीत जास्त कितीही रुपयांनी अॅन्युटी खरेदी करु शकतात. तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढी जास्त पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही पेन्शनसाठी मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचा ऑप्शन निवडू शकता.

दर महिन्याला १०,००० रुपयांची पेन्शन

एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लानमध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करायची आहे. तुम्ही दर १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला १,३६,००० रुपये मिळणार आहेत. सहा महिन्याला ६६,६४० रुपये तर तीन महिन्याला ३२,९८० रुपये मिळणार आहे. तुम्हाला महिन्याला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT