LIC Scheme Saam TV
बिझनेस

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

LIC Saral Pension Scheme: एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

एलआयसी सरल पेन्शन योजना

दर महिन्याला मिळणार १२००० रुपयांची पेन्शन

फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. हे पैसे जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे. ही योजना एलआयसी म्हणजे सरकारी कंपनीद्वारे चालवली जाते. त्यामुळे योजनेत सुरक्षित परतावा मिळतो.

एलआयसीची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme)

एलआयसीच्या या योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या योजनेत ४० ते ८० वयोगटातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. पती-पत्नी दोघे मिळूनदेखील योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभर पैसे मिळवू शकतात. सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडे दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा होईल. तुम्ही सेवानिवृत्तीची ग्रॅच्युटी आणि पीएफ फंड या योजनेत गुंतवणूक करु शकतात. यामुळे तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही ६ महिन्यात सरेंडर करु शकतात. या योजनेत डेथ बेनिफिटदेखील मिळतो. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला पैसे दिले जातात.

एलआयसी सरल पेन्शन स्कीममध्ये दर महिन्याला कमीत कमी १२००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करायची असते. यामध्ये गुंतवणूकीची कमाल मर्यादा निश्चित नाही. तुमच्या गुंतवणूकीवर आधारित तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. एकदा प्रिमियम भरल्यानंतर तुम्ही सहामाही, तिमाही किंवा महिन्याला पेन्शन घेऊ शकतात.

महिन्याला मिळणार १२००० रुपयांची पेन्शन

एलआयसीच्या या योजनेत जर तुम्ही ३० लाखाची अॅन्युटी खरेदी केली तर तुम्हाला दर महिन्याला १२,३८८ रुपये मिळणार आहे. ४२ वर्षीय व्यक्तीने ३० लाख गुंतवल्यावर महिन्याला १२,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला आयुष्यभर ही पेन्शन मिळणार आहे. हा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फूड डिलीवरीवाल्यासोबत वाद; हेल्मेट आणि लाथाबुक्क्यांनी मारलं, व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: एक्सप्रेस वे बंद केल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी, तिकीट खिडक्यांवर लागलेला लांबच लांब रांगा

Pune : तुझ्यामुळे ब्रेकअप झालं; मित्राकडून मित्रावर कोयत्याने घाव, रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Skin Itching Symptoms: कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे खाज सुटते? यावर उपाय काय? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'प्रोपिलिन' गॅसची गळती, २२ तासांपासून वाहतूक ठप्प; नेमका धोका काय?

SCROLL FOR NEXT