LIC Scheme Saam tv
बिझनेस

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १ लाखांची पेन्शन मिळवा

LIC Jeevan Shanti Policy: एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्हाला वर्षाला १ लाख रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

एलआयसीची न्यू जीवन शांती पॉलिसी

एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

वर्षाला मिळणार १ लाखांची पेन्शन

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.एलआयसीच्या जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर १ लाखांची पेन्शन मिळते. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीतील योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. एलआयसी जीवन शांती हा सिंगल प्रिमियम प्लान आहे.

गॅरंटीड पेन्शन

एलआयसीच्या या योजनेत तुम्ही पगारातील ठरावीक रक्कम गुंतवायची आहे. यातून येणाऱ्या परताव्यातून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. यानंतर तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळणार आहे.

गुंतवणूकीचे ऑप्शन

एलआयसीच्या पॉलिसीत ३० ते ७९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत कोणताही रिस्क कव्हर नाहीये. परंतु या योजनेत अनेक फायदे मिळतात. एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसाठी दोन ऑप्शन मिळतात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ.

एलआयसीच्या न्यू जीवन शांती स्किममध्ये तुम्ही पेन्शनची लिमिट ठरवू शकतात. या योजनेत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते. जर कोणताही ५५ वर्षीय व्यक्ती ११ लाख रुपये जमा करत असेल आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला वर्षाला १,०१,८८० रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला ८,१४९ रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT