LIC Kanyadan Policy Saam Tv
बिझनेस

LIC Kanyadan Policy: दररोज १२१ रुपये जमा करा अन् २७ लाख मिळवा; LIC ची कन्यादान योजना नेमकी आहे तरी काय?

LIC Kanyadan Policy For Girls: एलआयसीची मुलींसाठी खास योजना आहे. एलआयसी कन्यादान योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता मिटणार आहे.

Siddhi Hande

सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या अनेक योजनांचा समावेश आहे. एलआयसीने आतापर्यंत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. एलआयसीची मुलींसाठी एक खास योजना आहे. एलआयसी कन्यादान पॉलिसी या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता मिटणार आहे.

LIC Kanyadan Policyमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करु शकतात. या योजनेत तुम्हाला रोज १२१ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याचाच अर्थ असा की, तुम्हाला महिन्याला ३६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतात.

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये मॅच्युरीटीचा कालावधी १३ ते २५ वर्ष आहे. जर तुम्ही रोज ७५ रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही महिन्याला २२५० रुपयांची गुंतवणूक कराल. या योजनेत तुम्हाला मॅच्युरीटीनंतर १४ लाख रुपये रक्कम मिळेल. या योजनेत गुंतवणूकीच्या रक्कमेवर तुम्हाला किती रुपये मिळणार हे ठरवले जाते.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय किमान १ वर्ष असावे. एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला टॅक्सपासून सवलतदेखील मिळते. कायदा 1961 च्या कलम 80c अंतर्गत प्रीमियमवर १.५ लाखापर्यंतची टॅक्स सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT