LIC Jeevan Anand Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा; एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीचं कॅलक्युलेशन काय? जाणून घ्या

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीने नागरिकांसाठी जीवन आनंद पॉलिसी राबवली आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज फक्त ४५ रुपये गुंतवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जेणेकरुन वृद्ध काळात तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळेल. यासाठी अनेक सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आहे. गुंतवणूकीसाठी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी उत्तम आहे.

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत रोज ४५ रुपयांची गुंतवणूक करुन २५ लाख रुपये मिळवू शकतात. (LIC Policy)

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसी हा एक टर्म प्लान आहे. या योजनेत तुम्ही कितीही कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मॅच्युरिटीनंतर अनेक फायदे मिळतात. या योजनेत कमीत कमी १ लाख रुपये एश्योर्ड असतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीत तु्म्ही दररोज ४५ रुपयांची गुंतवणूक करु शकतात. महिन्याला तुम्ही १३५८ रुपये जमा करु शकतात. या योजनेत मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहे.

जीवन आनंद पॉलिसी ही लाँग टर्म इन्वेस्टमेंट आहे. या योजनेत तुम्ही जर दररोज ४५ रुपये ३५ वर्षांसाठी भरले तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. या योजनेत तुम्ही दिवसाला ४५ म्हणजेच वर्षाला १६,३०० रुपयांची गुंतवणूक करतात. (LIC Jeevan Anand Policy)

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यानंतर ५,७०,५०० रुपये जमा होतात. यातील ५ लाख रुपये एश्योर्ड असते.त्यानंतर रिविजनरी बोनस ८.६० लाख रुपये मिळतात. त्यानंतर फायनल बोनस ११.५० लाख रुपये मिळतो. यामुळे तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या जीवन आनंद पॉलिसीत कर सूटदेखी मिळतात. या योजनेत तुम्हाला दोन वेळा बोनस दिला जातो. परंतु त्यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT