LIC Scheme Saam tv
बिझनेस

LIC Scheme: दररोज १५० रुपये भरा अन् १९ लाख मिळवा; LIC ची भन्नाट योजना

LIC Children Money Back Policy: एलआयसीने लहान मुलांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला १५० रुपये गुंतवले तर १९ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे, यासाठी त्यांच्या लहानपणापासूनच काही पैसे बाजूला काढून ठेवतात. परंतु तुम्ही जर हे पैसे एखाद्या योजनेत गुंतवणूक केले तर तुम्हाला फायदा होईल. यासाठी एलआयसीने अनेक योजना राबवल्या आहे. एलआयसीच्या एका योजनेत तुम्ही फक्त १५० रुपये गुंतवून १९ लाख रुपये मिळवू शकतात.

मुलांच्या शिक्षणाची पालकांना खूप काळजी असते. परंतु यासाठी गुंतवणूक करायला हवी. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही १९ लाखांपर्यंत फंड जमा करु शकतात. हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकतात. एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लानमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

एलआयसीची ही योजना नॉन लिंक्ड, पार्टिसिपेंटिंग योजना आहे. यामध्ये ० ते १२ वर्षांपर्यंतचे मुले गुंतवणूक करु शकतात.

गुंतवणूकीचा फंडा

जर तुम्ही मुलाच्या जन्मापासून या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात करतात.या योजनेत तुम्ही दररोज जर १५० रुपये गुंतवणूक करतात तर महिन्याला ४५०० रुपये गुंतवणार आहात. वर्षभरात ही रक्कम ५५,००० रुपये होणार आहे. जर तुम्ही २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर १४ लाख रुपये गुंतवणार आहात. मॅच्युरिटी पॉलिसीवर तुम्हाला व्याजदेखील मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला १९ लाख रुपये मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही हे पैसे वापरु शकतात.

एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला प्रिमियम मासिक, तिमाही किंवा सहा महिन्याला भरावे लागते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ठरावीक वयानंतर मनी बॅक लाभ मिळतो. १८,२०,२२ आणि २५ वर्षे असे वय निश्चित केले आहे. या योजनेत १८, २० आणि २२ वर्षासाठी २०-२० टक्के एश्योर्ड रक्कम मिळते. २५ वर्षानंतर मुलांना गुंतवणूकीवर ४० टक्के बोनस मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT