Dhanshri Shintre
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे असे वाटते, जेणेकरून शिक्षण किंवा लग्नाच्या वेळेस आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.
तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी पैसे बाजूला ठेवायचे असतील, तर ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आर्थिकदृष्ट्या निर्धास्त राहू शकता.
जरी बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले, तरी बहुतांश लोक सुरक्षिततेमुळे सरकारी योजनांनाच अधिक पसंती देताना दिसतात.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या SSY योजनेत, 10 वर्षांखालील मुलीसाठी फक्त ₹250 मध्ये खाते उघडण्याची सुविधा मिळते.
मुलांच्या नावाने PPF खाते उघडता येते, ज्यात ₹500 पासून गुंतवणूक सुरू करता येते. ₹1.5 लाखपर्यंत गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि करसवलत मिळते.
१९९३ मध्ये सुरू झालेल्या बीएसवाय योजनेत, गरिब कुटुंबांतील मुलीला जन्मापासून शैक्षणिक खर्चासह सरकारी आर्थिक मदत मिळण्याची सुविधा दिली जाते.
पाच वर्षांत परिपक्व होणारी एनएससी पोस्ट ऑफिसमधून फक्त ₹1,000 मध्ये खरेदी करता येते आणि 10 वर्षांच्या मुलाच्या नावाने खाते उघडता येते.
केव्हीपी योजनेत अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करता येते. ₹1,000 पासून सुरुवात करता येते आणि रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते.