Surabhi Jayashree Jagdish
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य आज उत्तम लाभणार आहे.
निर्जला एकादशी विशेष विष्णू उपासना आज फलदायी ठरणार आहे. कलाक्षेत्रात सुसंधी मिळणार आहे.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती आज राहील. नातेवाईकांच्या, भावंडांच्या शेजाऱ्यांच्या सहकार्याने आज पुढे जायला दिवस चांगला आहे.
आर्थिक लाभ होतील. पैशाची आवक चांगली राहिल्यामुळे मनाला एक वेगळी उभारी येईल.
मन आनंदी आणि आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आज निर्जला एकादशी आहे. विष्णू उपासना करावी.
कोणालाही जामीन राहू नका. सरकारी कामे शासकीय गोष्टी आज रखडण्याची शक्यता आहे.
मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने फुलून जाल. पेरून ठेवलेल्या गोष्टींची फळे मिळण्याचा आजचा दिवस आहे.
तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. प्रवासातून फायदा सुद्धा होईल
एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल.
महत्वाची कामे शक्यतो आज न केलेलीच बरी. किंवा दुपारनंतर पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी संभवत आहेत. कस लागेल इतकी कामे आज घडतील.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा योग आहे. एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याचे योग आहेत.