देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. खूप कमी लोक पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करतात. परंतु काहींना वेळ लागतो. परंतु हार न मानता सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात नक्कीच यश मिळते. असंच काहीस निशांत जैन यांच्यासोबत झालं. निशांत यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)
निशात जैन हे मूळचे उत्तर प्रदेशच्या मेरठचे रहिवासी. त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांच्या या स्वप्नांचा अनेकांनी खिल्ली उडवली. यासाठी त्यांना नोकरीदेखील सोडावी लागली. परंतु त्यांनी हार मानली नाही. निशांत यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
निशांत हे पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरले. परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे भाषा. त्यांनी हिंदी माध्यमातून यूपीएससी परीक्षा दिली. (Success Story Of Nishant Jain)
निशांत यांनी ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशननंतर त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून नोकरीदेखील मिळाली. परंतु नोकरीमुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
पहिल्या प्रयत्नात त्यांनी फेल झाल्यावर त्यांना संसदेत ट्रान्सलेटर म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर नोकरीसोबत त्यांनी परीक्षेची तयारी केली.त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा परीक्षा दिली. त्यात ते यशस्वी झाले आणि आयएएस झाले.
आयुष्यात कितीही अपयश आले तरीही त्यातून बाहेर यायला हवे. अपयशातून माणूस खूप काही शिकतो आणि आयुष्यात मोठा होतो. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.