Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लंडनमधील नोकरी सोडली, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS हरि चंदना यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Hari Chandana Dasari: आयएएस हरि चंदना यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत हा एकच मार्ग आहे. अनेकांची यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. अनेकदा चांगली नोकरी असतानाही प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतात. असाच निर्णय हरि चांदना दसारी यांच्यासोबत झालं. (Success Story)

हरि चांदना दसारी या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सेंट एन्समधून १२वीची परीक्षा पास केला. हैदराबादच्या सेंट एन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि हैदराबाद विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांची आई गृहिणी होती. तर वडी १९८७ बॅचचे आयएएस अधिकारी होते. (Success Story of Hari Chandana Dasari)

हरि चांदाना दासारी यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि एनवायरमेंटल इकोनॉमिक्समध्ये एमएससी केले. त्यानंतर त्यांनी वर्ल्ड बँकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये बीपी शेलमध्येदेखील काम केले. परंतु त्यावेळीच त्यांना वडिलांसारखे सरकारी अधिकारी होऊन समाजसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली.

यानंतर हरि चांदना दासारी यांनी आपला मार्ग बदलला. त्यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.हरि चांदना दसारी यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी सर्वसामान्यांसाठी खूप काम केले. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी प्रधानमंत्री पुरस्कारदेखील देण्यात आला.

हरि चांदना यांनी अनेक पदांवर काम केले. त्यांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करुन त्यात झाडे लावली. त्यांनी अनेक ठिकाणी ही झाडे लावली. आता अनेक महिला या टाकाऊंपासून वस्तू बनवून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT