Gold Silver Rate (2nd August) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (2nd August): खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याचा भाव नरमला; चांदीच्या दरातही घसरण, जाणून घ्या आजचे दर

Today's 2nd August Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी आज किती पैसे मोजावे लागतील.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (2nd August):

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात वाढ झाली होती. भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत असते. मागच्या दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या वाढत्या दराने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले.

सोन्याच्या दरातील तेजीच्या सत्रामुळे भावात सतत चढउतार सुरु असते. जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येतो. मे व जून महिन्यात धातूच्या किंमती घसरल्या होत्या तर जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या वाढत्या दराने ग्राहकांची तारांबळ उडाली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले आहे. जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी आज किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार आज सोन्याचा (Gold) भाव २४ कॅरेटसाठी ५९,४५० रुपये मोजावे लागणार आहे. तर काल बाजारात मौल्यवान धातूची किंमत (Price) ५९,७८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, चांदी ७४,३३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. कालच्या ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,१९० रुपये प्रति किलो होती.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४९० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४९० रुपये इतका असेल.

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

SCROLL FOR NEXT