Tata Pickup Vehicles Saam Tv
बिझनेस

Tata Pickup Vehicles: Tata Motors ने लॉन्च केले 3 नवीन दमदार Pickup, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त पॉवर

Satish Kengar

Tata Pickup Vehicles:

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने आपली तीन नवीन व्यावसायिक वाहने लॉन्च केली आहेत. कंपनीने नवीन Intra V70, Intra V20 Gold आणि Ace HT+ लॉन्च केले आहेत.

ही नवीन वाहने चांगल्या मायलेजसह लांब अंतरावर अधिक पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. देशातील लोकांच्या गरजेनुसार या वाहनांची डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सर्वोत्कृष्ट फीचर्स देणारी ही वाहने विविध व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाऊ शकतात. तुम्ही टाटा मोटर्स सीव्ही डीलरशिपद्वारे ही वाहने बुक करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tata Intra V70

इंट्रा न्यू-जेन पिकअप अॅडव्हान्स ड्रायव्हिंग फीचर्स, हायपेलोड क्षमता, जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स आणि पॉवरफुल ड्राईव्हट्रेनसह ऑफर केली जाते. यात 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. हे फ्लीट एज टेलिमॅटिक्स सिस्टम आणि 9.7 फूट लांब लोड बॉडीसह येते. कार सारखा आराम आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी याची केबिन तयार करण्यात आली आहे. Intra V70 ची पेलोड क्षमता 1700 kg आहे. कंपनीने म्हटले आहे की, याचे इंजिन 220Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. (Latest Marathi News)

Tata Intra V20 Gold

हा भारतातील पहिला आणि एकमेव Bi-fuel पिकअप ट्रक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, याची सीएनजी टाकी पूर्ण भरल्यावर 800 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. हा पिकअप फ्लीट एज टेलिमॅटिक्स सिस्टमसह येतो. टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, हे पिकअप 1,200 किलोग्रॅमच्या वाढीव पेलोड क्षमतेसह आणि कुठेही जाण्यासाठी तीन सीएनजी टँकसह डिझाइन केले गेले आहे.

Tata Ace HT+

हा पिकअप 20 लाखांहून अधिक ग्राहकांसह भारतातील सर्वात यशस्वी व्यावसायिक वाहनांपैकी एक आहे. हे पिकअप 900 किलोग्रॅमच्या वाढीव पेलोड क्षमतेच्या सुविधेसह सादर करण्यात आले आहे. याच्या 800cc डिझेल इंजिनची कमाल पेलोड क्षमता 900kg आहे आणि हे इंजिन 35bhp पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT