Gold Silver Price Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate: अधिक मासात सोने झाले स्वस्त; खरेदीदारांची चांदी; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या...

Today 25th July Gold Price In Maharashtra :आज २४ कॅरेटच्या भावात घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Latest Update on Gold Silver Rate in Maharashtra (25 July 2023)

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहे. मागच्या दोन महिन्यापासून यात सातत्त्याने वाढ होताना दिसून येत होती. अशातच अधिक मास सुरु होताच व जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीचा दर घसरला.

अशा परिस्थितीत खरेदीदारांचा कल हा सोन्या-चांदीकडे आज अधिक प्रमाणात दिसून येईल. या महिन्यात सोन्याने २००० चा टप्पा ओलांडला असून चांदीने ६५०० रुपयांची वाढ झालेली आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्या-चांदीत फारसे बदल झाले नाही. अशातच आज सकाळी सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. जाणून घेऊया आज १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत ते.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,530 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,320 रुपये इतका भाव होता तर आज २५ जुलै ला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,150 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,150 रुपये मोजावे लागणार आहेत. मागच्या भावानुसार आज २४ कॅरेटच्या भावात १७० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

अधिक मासात (Adhik Mass) जावईबापूला सोने-चांदी वाण म्हणून दिले जाते. तसेच विवाहित महिला या सोन्या-चांदीच्या दागिन्यात वाढ करतात. अशातच गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार 25 जुलैला चांदीच्या १० ग्रॅम भावासाठी 770 रुपये मोजावे लागले तर आज 1 किलो चांदीसाठी 77,000 रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 60,380 रुपये

  • दिल्ली - 60,150 रुपये

  • हैदराबाद - 60,000 रुपये

  • कोलकत्ता - 60,000 रुपये

  • लखनऊ - 60,150 रुपये

  • मुंबई - 60,000 रुपये

  • नागपूर - 60,000 रुपये

  • पुणे - 60,000 रुपये

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT