Petrol Diesel Price  (23rd May 2024)
Petrol Diesel Price Canva
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर; 1 लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष हे येत्या जून महिन्यांकडे आहे. काही दिवसांतच निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर प्रश्न राहतो तो सर्वसामान्य नागरिकांचा. बहुतेकदा निवडणुकानंतर सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेटमध्ये चढ-उतार दिसून येतो. विशेष म्हणजे पहिला फटका बसतो तो पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर.

सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदल होणे म्हणजे त्यांचे आर्थिक गणित कोलमंडते. मात्र आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती काही दिवस झाले स्थिरावल्या आहेत.परंतू याच किंमतीत कधीही मोठ्या प्रमाणाच वाढ होऊ शकते किंवा याच किंमती अजूनही कमी होऊ शकतात,अद्याप अजून काही सांगू शकत नाही.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती जेव्हा कमी होतील तेव्हा होतील, मात्र तुम्हाला माहिती आहे का?पेट्रोल-डिझेलचे नवीन दर कोण जाहीर करत असतात तसेच नवीन दर सर्वसामान्य नागरिकांना कसे समजतात.चला तर पाहूयात यासर्व विषयाची विस्तृत माहिती.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दररोज सकाळी ठिक ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात.या पेट्रोल- डिझेलच्या नवीन किंमती राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज अपडेट करत असतात.आजही अर्थात २३ मे च्या नवीन किंमती(price) जाहीर झाल्या आहेत.

नवीन किंमतीनुसार मुंबई शहराससह पुणे आणि इतर शहरातील किंमतीत जास्त फरक दिसून येत नाही, तसेच मोठ्या शहरात जसे की, दिल्ली (delhi) , कोलकत्ता आणि चेन्नई या शहरातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जास्त तफावत झालेली आढळलेली नाही. दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता शहरात पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे. चैन्नईत पेट्रोल १००.९८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.५६ रुपये प्रति लीटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४.५३ रुपये, अकोल्यात पेट्रोल १०४.१६ , धुळे पेट्रोल १०४.५६, हिंगोली १०६.८८, लातुर पेट्रोल १०५.३६ रुपये प्रति लिटर दर आहे. | तर अहमदनगरमध्ये डिझेल ९१.०६ रुपये प्रति लिटर आणि अकोल्यात ९०.७२ रुपये, धुळ्यात ९१.०९ , हिंगोली ९३.३१ रुपये, लातुरमध्ये ९१.८६ रुपये प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होतेय.

शहरानुसार तपासा पेट्रोल- डिझेलचे दर

भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी, तेल कंपन्या दररोज MMS द्वारे किंमत तपासण्याची सुविधा देतात. HPCL ग्राहक नवीनतम दर जाणून घेण्यासाठी 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवू शकतात. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास , तुम्हाला RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. दुसरीकडे , नवीन किंमत तपासण्यासाठी, बीपीसीएलच्या ग्राहकांना ९ २२३११२२२२ या क्रमांकावर <डीलर कोड> पाठवावा लागेल. यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत नवीनतम दरांची माहिती मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung ते Oppo, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भारतात लॉन्च होणार हे जबरदस्त स्मार्टफोन

Budh Gochar: एक जुलैपासून बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश; ५ राशींचं चमकणार नशीब

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

England Team: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

Weekly Horoscope: आजपासून बदलणार या 5 राशींचे भाग्य, 7 दिवस सूर्यासारखे चमकेल नशीब

SCROLL FOR NEXT