Occupant Class 2 land rules explained with complete conversion process to Class 1. saam tv
बिझनेस

Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

Occupant Class 2 Land Rules : भोगवटादार वर्ग २ जमीन म्हणजे काय? हस्तांतरणावरील निर्बंध आणि वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेसह समजून घ्या.

Bharat Jadhav

  • भोगवटदार वर्ग 2 जमिनीवरील विक्रीवर शासनाचे निर्बंध असतात.

  • वर्ग 1 मध्ये रूपांतर केल्यास जमिनीचा व्यवहार करता येतो.

  • रूपांतरणासाठी अर्ज जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात करावा लागतो.

जमिनीचे रुपांतर म्हणजे एका उपयोगाची (उदा. शेती) जमीन दुसऱ्या उपयोगासाठी (उदा. निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक) बदलून घेणं. म्हणजेच भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणं. हे कशाप्रकार केलं जाते. ते जाणून घेऊन. त्यापूर्वी भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? हे समजून घेऊ. भोगवटादार वर्ग-2 - या अशा जमिनी ज्यांच्या हस्तांतरणावर म्हणजेच विक्रीवर शासनाने निर्बंध घातलेले असतात.

सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्या जमिनी हस्तांतरित केल्या जाऊ शकत नाहीत. या जमिनींना 'नियंत्रित सत्ता प्रकार' किंवा 'प्रतिबंधित सत्ता प्रकार' असेही म्हटलं जातं. या जमिनींवर काही प्रमाणात निर्बंध असल्याने त्यांचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. अर्ज कशाप्रकारचा असतो, कसा करायचा ते जाणून घेऊ.

भोगवटादार वर्ग-2मधील जमिनीची विक्री करण्यास शासनाची परवानगी आवश्यक असते. परवानगीशिवाय या जमिनींची खरेदी-विक्री करता येत नसते. परंतु काही नियमांनुसार या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येते. त्याकरीता तहसील कार्यालयातील तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो.

अर्जाची प्रक्रिया

तहसील कार्यालयात किंवा प्रांत कार्यालयात अर्ज सादर करा.

अर्जामध्ये जमिनीचा सर्वे नंबर आणि गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे (शेती, घर बांधकाम, इ.) अशी अचूक माहिती द्या.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे ओळखपत्र लागते. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानकार्ड चालेल.

सातबारा उतारा आणि आठ अ उतारा

फेरफार उतारा, मिळकत दाखला, जमीन वर्ग दोनची मंजुरी आदेशाची प्रत

जमीन वापर प्रमाणपत्र

नागरी सुविधा असल्याचे प्रमाणपत्र (गावठाण हद्दीबाहेर असल्यास आवश्यकता नाही, असल्यास जमीन मोजणी नकाशा आवश्यक असतो)

यासोबत चलनाची प्रत अर्जासोबत जोडावी.

या गोष्टी आहेत महत्त्वाच्या

जमीन सरकारी असल्यास ती शासन आदेशानुसार वर्ग एकमध्ये रूपांतर करता येते.

जमीन कोणत्याही न्यायालयीन वादात नसावी.

शासकीय रेकॉर्डनुसार जमीन मालकाच्या नावावर असली पाहिजे.

जमीन महसूल थकबाकी नसली पाहिजे.

स्थानिक प्राधिकरणाच्या (ग्रामपंचायत किंवा महापालिका)

चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणी

यानंतर तहसीलदार किंवा तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करतील.

चौकशीनंतर अहवाल तयार केला जाईल.

अहवालानुसार अर्जास मंजुरी किंवा नकार दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: मलायका अरोरा 33 वर्षाच्या हर्ष मेहताला करतेय डेट? एयरपोर्टवर दिसले एकत्र, VIDEO व्हायरल

Friday Horoscope : मनस्ताप सहन करावा लागेल; ५ राशींच्या लोकांनी जपून निर्णय घ्यावेत

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी, अंजली दमानिया घेणार अमित शहांची भेट

रिअल-टाईम क्रिमिनल फिल्टर लागू; कर्जासाठी आता गुन्हेगारी रेकॉर्डचीही तपासणी|VIDEO

सनम बेवफा! नवरा बाथरूममध्ये गेला, बायकोचं बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु; पतीनं गळा दाबून संपवलं, लिपस्टिकनं भिंतीवर..

SCROLL FOR NEXT