Lakhpati Didi Scheme Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

Lakhpati Didi Scheme For Women: सरकारची महिलांसाठी खास योजना आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंतचे लोन मिळते.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना १ लाख ते ५ लाखापर्यंतचे लोन मिळते. (Lakhoati Didi Scheme)

लखपती दीदी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात आली आहे. प्रत्येक महिला ही स्वावलंबी आणि स्वतः च्या पायावर उभी राहावी या उद्देषाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना स्कीनल ट्रेनिंगदेखील दिले जाते.

२०२३ पर्यंत १ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळे स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे या योजनेवर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.

लखपती दीदी योजनेत व्यसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय सुरु करण्यापासून ते अगदी त्याचे मार्केटिंग करण्यापर्यंत सर्व सुविधा दिल्या जातात. (Lakhpati Didi Scheme for Womens)

पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या महिला बचत गटात सहभागी असणे गरजेचे आहे. त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लान प्रादेशिक स्वयं सहायता कार्यालयात जमा करावी लागेल. यानंतर तुमचा अर्ज मान्य केला जाईल. त्यानंतर तुम्हाला लोन दिले जाते. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT