Lakhpati Didi Yojana Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी खास योजना! कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार ५ लाखांचं कर्ज; योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा

Lakhpati Didi Yojana News: केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. महिलांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने राबवली लखपती दीदी योजना

महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज

१ ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहावे,त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, या दृष्टीने योजना राबवल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana)

२०२३ मध्ये सरकारने लखपती दीदी योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना बिझनेस सुरु करण्यासाठी ट्रेनिंग दिले जाते. यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो.

लखपती दीदी योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज दिले जाते. महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा, यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. त्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तुमच्या बिझनेसनुसार हे पैसे दिले जाणार आहे.

लखपती दीदी योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना आर्थिक मदतीसोबतच स्कील ट्रेनिंगदेखील दिले जाते. यामध्ये अनेक क्षेत्रातील प्रोफेशनल्सकडून प्रशिक्षण दिले जातात. बचत गटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बिझनेस प्लान सादर करावा लागेल

लखपती दीदी योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेतील महिला भारतातील रहिवासी असाव्यात. महिला बचत गटाशी जोडलेल्या असाव्यात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना बिझनेस प्लान जमा करावा लागेल. याचसोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care : तुमचे केस कुरळे आहेत? मग केसांवर 'या' गोष्टी कधीच लावू नका

Jio OTT Free: Jio युजर्ससाठी खुशखबर! फक्त 500 रुपयांत मिळणार 14 OTT प्लॅटफॉर्म मोफत

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसला 'या' सदस्याचं वागणं खटकलं; बाहेर जाण्यासाठी थेट दार उघडलं, पाहा VIDEO

Accident: फायर ब्रिगेडच्या वाहनाची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Kudi Designs: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT