Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin yojana : 1500 की 3000 ? संभ्रम दूर; लाडकीला महिला दिनाचं गिफ्ट मिळणार, पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin yojana update : लाडक्या बहिणींना महिला दिनाचं गिफ्ट मिळणार आहे. मार्च महिन्यात 1500 मिळणार की 3000 रुपये ? याचाही संभ्रम दूर झालाय. पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता लाडकींच्या घटत्या संख्येमुळे चर्चेत आहे. निकषांची कठोर पडताळणी होत असल्यानं लाभार्थींची संख्या तब्बल ९ लाखांनी घटली आहे. लाडकींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे फेबुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का? असा सवाल केला जात होता.यावरच आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. फेब्रुवारीचा १५०० रुपयांचा आठवा हफ्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हफ्ता जमा होईल, असे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर आक्षेप घेतला होता. या योजनेमुळेच विरोधकांना नैराश्य आलं आहे, अशी टीकाही तटकरेंनी केली आहे. तर विरोधकांनीही लाडकीमुळे इतर योजना बंद पडल्याचा हल्लाबोल केलाय.

लाडकीवरुन विरोधकांचा घणाघात

लाडकीमुळे इतर योजना बंद झाल्या, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. गेल्या दोन महिन्यांत 9 लाख लाभार्थीची संख्या कमी झाली आहे. छाननीत जानेवारी महिन्यात 5 लाख, तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रूपयांनी वाचणार आहे.

यंत्रणेच्या कडक पडताळणीमुळे लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात घटते आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय. त्य़ातच 1500 चा हफ्ता 2100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता लाडकीना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT