Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी, आता प्रत्येक वर्षाला द्यावी लागणार कागदपत्रे

Ladki Bahin Yojana E KYC Process: लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेत महिलांची आताा दरवर्षी केवायसी करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. ज्या महिलांना नियमांत न बसतानादेखील योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

आता लाडकी बहीण योजनेत महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. दरवर्षी जून महिन्यात आता महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. जेणेकरुन महिलांची सर्व माहिती खरी आहे की खोटी याची माहिती मिळणार आहे. या योजनेत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केला होता. त्यातील २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. दरम्यान, अजूनही ११ लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी बाकी आहे. या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डशी जोडले गेले नाही. (Ladki Bahin Yojana Update)

गेल्या आठवड्यापासूनच लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. आता उत्पन्नाची पडताळणी होणार आहे. आयकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत. त्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गेत असलेल्या २.३ लाख महिलांना बाद करण्यात आले आहे. त्यानंतर आता ज्या महिला सरकारच्या इतर योजनांमधून १५०० किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतात. त्यांनाही वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी १ जून ते १ जुलै या काळात ई-केवायसी केले जाणार आहे.लाभार्थी महिला आहे की नाही तसेच त्यांची माहिती खरी आहे की नाही यासाठी केवायसी केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT