Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी? समोर आली मोठी अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana April Month Installment: लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु केली होती. या योजनेत आत एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान, आता एप्रिल महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो.

लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana April Month Installment)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला १० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत गेल्या ३-४ महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात.

एप्रिलचा हप्ता लांबणार?

लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याचीदेखील शक्यता आहे. आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता महागणार आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

९ लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेत तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद केले होते. ही संख्या अजून वाढण्याचीदेखील शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT