Ladki Bahin Yojana  Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

Ladki Bahin Yojana February-March Month Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, अपात्र महिलांना ३००० रुपये मिळणार नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ७ मार्च रोजी फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. महिला दिनाच्या आधी महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात ७ मार्चपर्यंत ३००० रुपये जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांची पडताळणी सुरु झाली आहे. जानेवारीत ५ लाख महिलांचे अर्ज बाद केलेत तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यात तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे अडीच कोटी महिलांना पैसे मिळणार आहे. फक्त ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. यात ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. महिला जर सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही.तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Freedom Offer: १ रुपयाच्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल अन् 60GB डेटा, ३० दिवस चालणार

FAStag Annual Pass: ३००० रुपयात मिळणार FAStag वार्षिक पास; वाहनधारकांना होणार ५ फायदे; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी भिमाशंकरला भाविकांनी गर्दी केली

Heart attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या आठवड्याभरापूर्वी दिसतात 6 मोठे बदल; ही लक्षणं कोणती आहेत वाचा

बाथरूम घुसले अन् इनरवेअरची तपासणी, पोलिसांनी नको ते प्रश्न विचारले; पुण्यातील तरूणीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT